‘भावाच्या मृत्यूनंतरही एंजॉय करत आहेस’, म्हणणाऱ्या ट्रोलर्सला निक्की तांबोळीने दिले खणखणीत उत्तर

Bigg Boss fame actress Nikki tamboli give answer to trollers


बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिच्या भावाचा मृत्यू झाला होता. या गोष्टीची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. तिने सांगितले होते की, तिच्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

निक्की तांबोळी लवकरच रोहित शेट्टी सोबत ‘खतरों के खिलाडी’ मध्ये दिसणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चित्रपटाची आणि मालिकांची शूटिंग बंद झाली आहे. त्यामुळे या शोची शूटिंग देखील दुसरीकडे केली जाणार आहे. या शोची शूटिंग साऊथ आफ्रिकामध्ये केली जाणार आहे. निक्की तांबोळीला काही दिवसांपूर्वी विमानतळावर स्पॉट केले होते. त्यामुळे अनेक लोकांनी तिच्यावर निशाणा साधला होता. सोशल मीडियावर ट्रोलर्स म्हणत होते की, ‘नुकतेच तिच्या भावाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिला आता तिच्या घरी कुटुंबासोबत असायला हवे होते. पण ती बाहेर फिरत आहे.’

निक्की तांबोळीने या ट्रोलर्सला खणखणीत उत्तर दिले होते. तिने लिहिले होते की, “काही मूर्ख माणसं मला मेसेज करून कमेंट करून सांगत आहेत की, नुकतेच तुझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. तुला अस एंजॉय करताना लाज वाटत नाही का? मी अशा लोकांना सांगू इच्छिते की, माझं देखील एक आयुष्य आहे आणि मला देखील खुश राहण्याचा अधिकार आहे. माझ्यासाठी नाहीतर माझ्या भावासाठी कारण त्याला नेहमीच मला आनंदी बघायचे होते.”

निक्की तांबोळीने पुढे सांगितले की, “ज्या लोकांना काही काम नाहीत ते लोक माझ्या पोस्टवर अशा कमेंट करून नकारात्मकता पसरवत आहेत. मी तुम्हाला विनंती करते की, ही ऊर्जा तुम्ही तुमची स्वप्न साकार करण्यासाठी वापरा, त्याने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदच होईल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.