अभिनेत्री अक्षरा रेड्डी (Akshara Reddy) ही कमल हासन (Kamal Haasan) यांनी होस्ट केलेल्या ‘बिग बॉस ५ तमिळ’च्या स्टार स्पर्धकांपैकी एक होती. ज्याचा नुकताच विजय टीव्हीवर समारोप झाला. ८४व्या दिवशी ही अभिनेत्री ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आली आणि नंतर १०४व्या दिवशी ग्रँड फिनालेमध्ये पाहुणी म्हणून सहभागी झाली. सध्या या अभिनेत्रीचे नाव कायदेशीर वादांमुळे चर्चेत आहे. ज्यासाठी अलीकडेच ईडीच्या कोजिकोड कार्यालयात तिची चौकशी करण्यात आली.
अक्षराचा जवळचा मित्र अडकला होता सोन्याच्या तस्करी प्रकरणात
माध्यमांतील वृत्तानुसार, २०१३मध्ये सोन्याच्या तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात अक्षराला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे. केरळमधील कोजिकोड ईडी कार्यालयात तिची अनेक तास चौकशी करण्यात आली आणि पुन्हा एकदा अभिनेत्री या प्रकरणामुळे चर्चेत आल्याचे सांगण्यात येत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, असा आरोप करण्यात आला आहे की, अक्षराचे खरे नाव श्रव्या सुधाकर आहे आणि सोन्याच्या तस्करी प्रकरणाने केरळच्या लोकांना धक्का दिला, तेव्हा ती मॉडेलिंगमध्ये होती. या खळबळजनक प्रकरणात अभिनेत्रीच्या एका जवळच्या मित्राचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
अक्षरावर खरी ओळख लपवल्याचा आहे आरोप
सोन्याच्या तस्करी प्रकरणातील अक्षराच्या मित्राचे नाव फैज असून, तो मूळचा वडकारा येथील रहिवासी आहे. १९ सप्टेंबर २०१३ रोजी कोची विमानतळावरून दोन बुरखा घातलेल्या महिलांना २० किलो सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते. सोन्याच्या तस्करी प्रकरणानंतर अक्षराने केवळ नावच बदलले नाही, तर तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरीही केली, असाही आरोप आहे.
मुख्य आरोपीसह २ कस्टम अधिकाऱ्यांनाही करण्यात आली होती अटक
तपास पथकाने नंतर मुख्य आरोपी फैज आणि दोन कस्टम अधिकाऱ्यांना तस्करी प्रकरणात अटक केली. फैजचे चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींशी संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. सोन्याच्या तस्करीतून कमावलेला पैसा फैज चित्रपटसृष्टीत वापरत असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आधीच होता.
हेही वाचा :










