‘मॅम किती गोड स्माईल आहे तुमची!’, शहनाझ गिलचे हसने पाहून पॅपराजीही झाले फिदा


‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक शहनाझ गिल आपल्या वेगवेगळ्या स्टाईलने आणि अंदाजाने प्रेक्षकांना तिच्याकडे आकर्षित करत असते. शहनाझ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तसेच ती मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या स्टाईलचे आणि पोझचे फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिचे फोटो‌ बघण्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियावर तिचा कोणताही फोटो शेअर होता क्षणी वेगाने व्हायरल होत असतो. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. 

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शहनाझ पॅपराजींना पोझ देतात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शहनाझने पांढरा टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. तसेच चेहऱ्यावर मास्क लावलेला असतो. ती रस्त्यावरून चालत येत असते. तितक्यात पॅपराजी तिला म्हणतात की, “मॅम तिकडेच मास्क काढा ना.” त्यानंतर ते तिला पोझ द्यायला सांगतात. यावर पॅपराजी म्हणतात की, “मॅम स्माईल तरी द्या, किती गोड स्माईल आहे तुमची.” यावर ती हसून पोझ देते. यानंतर ती विचारते, “झालं का?” यावर पॅपराजी म्हणतात की, “तुमचे किती पण फोटो काढले तरी कमीच आहे.” यानंतर ती बाय म्हणून तिच्या गाडीत निघून जाते.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूपच आवडला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहे (Bigg boss fame Shehnaaz gill’s video viral on social media)

शहनाझ गिल या आधी बादशाहसोबत ‘फ्लाई’ या गाण्यात दिसली होती. या आधी देखील ती अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. ‘बिग बॉस १३’ मध्ये तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. यानंतर तिला अनेक प्रोजेक्टच्या ऑफर आल्या. ती लवकरच ‘हौसला रख’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग कॅनडामध्ये पूर्ण झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट

-मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.