Tuesday, May 21, 2024

अर्रर्र! शिव ठाकरे एवढा ट्रोल का होतोय? वीणा जगतापसोबतचे ‘ते’ फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय, पण तितकाच वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा रियॅलिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस‘ होय. बिग बॉस हा शो देशभरातील घराघरात पोहोचला आहे. या शोचा चाहतावर्ग अफाट आहे. या शोला एवढा प्रतिसाद मिळत असल्यामुळेच कदाचित हा शो सध्या सोळाव्या पर्वात आहे. या शोचा सध्याचा 16वा हंगाम सुरू आहे. या शोमध्ये अनेक गोष्टी घडतात, ज्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा रंगते. आताही असंच काहीसं घडलं आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. ही खळबळ ‘बिग बॉस मराठी 2’ चा विजेता शिव ठाकरे याच्याशी संबंधित आहे.

शिव ठाकरे (Shiv Thakare) जेव्हा ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16)मध्ये आला होता, तेव्हापर्यंत त्याचा खेळ एकदम योग्य मार्गाने जात होता. पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचे मन जिंकण्यात तो यशस्वी ठरला होता. मात्र, त्यानंतर निम्रत कौर अहलुवालिया मित्र बनून शिवच्या गटात गेली, तेव्हा सर्वकाही बदलले. शिवदेखील कट रचू लागला, गॉसिपिंग करू लागला आणि फेक असल्याचे दिसू लागला. अशात आता त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवरून शिव ठाकरे भलताच ट्रोल होत आहे. यामागील कारण जाणून घेऊया…

काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 16’च्या एका एपिसोडदरम्यान दाखवण्यात आले होते की, सौंदर्या शर्मा, गौतम सिंग विज आणि त्यांच्या गटातील इतर सदस्य गार्डन भागात बसून चर्चा करत होते. त्यावेळी चर्चा करताना सौंदर्या अचानक गौतमच्या कुशीत जाऊन बसते. हे सर्व एकदम सामान्य होते. मात्र, हे सर्व पाहून काही अंतरावर बसलेले शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन (MC Stan) यांच्या भुवया उंचावतात.

शिव ठाकरेला सौंदर्या आणि गौतमच्या कृतीमुळे अडचण
शिव ठाकरे म्हणतो की, “छी… हे लोक काय करत आहेत?” यावर एमसी स्टॅनही त्याच्या हो मध्ये हो मिसळतो. तसेच, तो म्हणतो की, “हे सर्वजण कसे करतात.” टीना दत्ताही म्हणते की, “जेव्हा हे लोक करतात, तेव्हा लाज नाही वाटत. त्यानंतर आम्ही जेव्हा काही बोलतो, तेव्हा वाईट वाटते.”

शिव ठाकरेने बिग बॉस मराठीमध्येही केलंय असंच
यानंतर शिव ठाकरेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. हे फोटो तेव्हाचे आहेत, जेव्हा तो बिग बॉस मराठीमध्ये होता. शोमध्ये त्याचे नाव स्पर्धक वीणा जगताप (Veena Jagtap) हिच्याशी जोडले गेले होते. अनेकदा दाखवण्यात आले होते की, दोघेही एकमेकांच्या जवळ असायचे. म्हणजेच, शिव ‘बिग बॉस 16’मध्ये जे काही बोलत आहे, इथे फक्त लव्ह एँगल काम करतो, तो स्वत: ‘बिग बॉस मराठी 2’ (Bigg Boss Marathi)मध्ये हा खेळ खेळून आला आहे. हे फोटो शेअर करत एका युजरने लिहिले की, “अरे बापरे, हे काय पाहिलं? #ShivThakare!”

आता युजर्स हे फोटो शेअर करत शिव ठाकरेला ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले की, “हा तोच व्यक्ती आहे, जो सौंदर्या आणि गौतमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “शिवचे काळे कृत्य.”

या आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट
मागील एपिसोडबद्दल बोलायचं झालं, तर 15 नोव्हेंबर रोजी बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झाला होता. शालीन भानोट याने त्याच्यासोबतच टीना दत्ता, सौंदर्या शर्मा आणि गौतम सिंग विज यांची नावे नॉमिनेशनमध्ये टाकून दिली. खरं तर, शालीनला असे वाटते की, त्याला आणि टीनाला खूप जास्त मतं मिळतील. मात्र, सौंदर्य आणि गौतम यांच्यापैकी एकजण बाहेर जाईल. आतापर्यंत 3 जण घराबाहेर गेले आहेत. यामध्ये सृजिता डे, मान्या सिंग आणि गोरी यांचा समावेश आहे. या आठवड्यात घरात कॅप्टन साजिद खान आहे आणि त्याने अब्दू रोजिक, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, सुंबुल तौकीर खान आणि निम्रत कौर अहलुवालिया यांना नॉमिनेट होण्यापासून वाचवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खान कुटुंबीयांच्या जवळच्या दिग्दर्शकाची ऑफर आर्यनने लावली धुडकावून, वाचा कोण आहे तो?
‘आता काय तोंडात…’, फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफर्सवर जोरात भडकली शिल्पा शेट्टी, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा