Sunday, May 19, 2024

खान कुटुंबीयांच्या जवळच्या दिग्दर्शकाची ऑफर आर्यनने लावली धुडकावून, वाचा कोण आहे तो?

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान हा सध्या त्याच्या पुनरागमनामुळे भलताच चर्चेत आहे. तब्बल 4 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाहरुख रुपेरी पडद्यावर एंट्री करणार आहे. मात्र, सध्या यापेक्षा जास्त चर्चा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची रंगली आहे. आर्यन जसजसा मोठा होत आहे, तसतसा तो त्याचे वडील म्हणजेच शाहरुखसारखा दिसत आहे. आर्यन जेव्हाही लोकांसमोर जातो, तेव्हा त्याच्या अंदाजाने लक्ष वेधून घेतो. त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे की, आर्यनने आपल्या वडिलांप्रमाणे बॉलिवूड अभिनेता बनावे. मात्र, असे वाटते की, त्याला अभिनयात काहीच रस नाही. कारण, असे वृत्त आहे की, त्याने मोठ्या दिग्दर्शकांच्या ऑफर धुडकावून लावल्या आहेत.

आर्यनने नाकारल्या मोठ्या ऑफर्स
असे म्हटले जात आहे की, शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या कुटुंबाच्या जवळ असलेला दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याने नुकतेच आर्यन खान (Aryan Khan) याला एका शानदार सिनेमाची ऑफर दिली होती. मात्र, त्याने ही ऑफर धुडकावून लावली. करण त्याच्या होकाराची वाट पाहत राहिला, पण आर्यन त्याच्या निर्णयावर ठाम राहिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

‘द आर्चीज’साठी झोया अख्तरने दिलेली ऑफर
माध्यमांतील वृत्तांनुसार, करण जोहरच नाही, तर झोया अख्तर (Zoya Akhtar) हिनेदेखील तिच्या ‘द आर्चीज’ या आगामी सिनेमासाठी आर्यनला ऑफर दिली होती. मात्र, असे म्हटले जात आहे की, त्याने तिची ही ऑफरही धुडकावून लावली. आर्यन जरी लूक्सच्या बाबतीत बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्यासारखा असला, तरी असे म्हटले जात आहे की, त्याला कॅमेऱ्यापुढे येण्यात काहीच रस नाही. असेही म्हटले जात आहे की, आर्यनला अभिनेता नाही, तर दिग्दर्शक बनायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

शाहरुखचा वारसा लेक सुहाना नेणार पुढे
माध्यमांतील वृत्तांनुसार, आर्यन लवकरच लेखक म्हणून पदार्पण करू शकतो. असे म्हटले जात आहे की, तो वेब शो आणि फिचर सिनेमांवरील आयडियांवर काम करत आहे. दुसरीकडे, शाहरुखची मुलगी सुहाना खान तिच्या वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी अभिनयक्षेत्रात उतरली आहे. ती झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मध्ये दिसणार आहे. या सिनेमाची शूटिंगही सुरू झाली आहे. (Shahrukh Khan son Aryan Khan turned down launch offers from karan johar and zoya akhtar says reports)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आता काय तोंडात…’, फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफर्सवर जोरात भडकली शिल्पा शेट्टी, पाहा व्हिडिओ
दिग्दर्शकाच्या ‘त्या’ एका निर्णयाने मोडली होती राजेश खन्ना आणि अमोल पालेकरांची जुनी मैत्री, वाचा सविस्तर

हे देखील वाचा