‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर लावली आग! पाहा तिचे लेटेस्ट ब्लॅक बिकिनी शूट

bigg boss fame south indian actress heena panchal bold photos viral on instagram see pics


‘बिग बॉस’ मराठीमध्ये झळकलेली अभिनेत्री हिना पांचाळ, तिच्या बोल्डनेसने सतत चाहत्यांचे लक्ष वेधत असते. आपले फोटो व व्हिडिओ शेअर करून, ती सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेचा विषय बनते. नुकतेच हिनाने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर आग लावत आहेत.

हिना पांचाळने हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये चाहत्यांना तिची अत्यंत बोल्ड स्टाईल पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो की, या फोटोमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. ती ज्याप्रकारे फोटोसाठी पोज देत आहे, ते पाहून सर्वचजण तिच्यावर फिदा होत आहेत.

हिनाने हे हॉट बिकिनी शूट इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर, अगदी क्षणातच ते तूफान व्हायरल झाले. जो तो तिच्या बोल्ड स्टाईलचे कौतुक करत आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच, कमेंट्स करून युजर्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. याशिवाय हिनाचे इंस्टाग्रामवर ५ लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत, जे तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून पसंती देत असतात.

हिनाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात, २०१४ मध्ये रिलीझ झालेल्या ‘हम हैं तीन खुराफती’ या बॉलिवूड चित्रपटापासून केली होती. ती मराठी चित्रपटात अधिक सक्रिय आहे. मात्र तिने तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. हिनाने २०१५ मध्ये रिलीझ झालेल्या ‘यगवारायनुम ना काक्का’ या तमिळ चित्रपटात काम केले आहे. याशिवाय २०१६ मध्ये रिलीझ झालेल्या, कन्नड चित्रपट ‘लॉड्डे’ आणि तेलुगु चित्रपट ‘मालूपू’ मध्येही ती दिसली आहे.

‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून हिनाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. २०१९ मध्ये बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या सीझनमध्ये अभिनेत्री दिसली होती. याशिवाय हिना कलर्स चॅनलवरच्या ‘मुझसे शादी करोगे’ शोमध्ये दिसली आहे. या शोचे होस्ट बिग बॉस फेम गौतम गुलाटी, विकास गुप्ता आणि मनीष पॉल हे होते. या शोमध्ये पारस छाब्रा आणि शहनाज गिल देखील दिसले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.