Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन सिंगल की कमिटेडच्या प्रश्नावर अरबाझने दिलं उत्तर, ऐकून सगळ्यांनाच बसला धक्का…

सिंगल की कमिटेडच्या प्रश्नावर अरबाझने दिलं उत्तर, ऐकून सगळ्यांनाच बसला धक्का…

बिग बॉस म्हटलं की चर्चा आलीच. बिग बॉस मराठीचा हा सिझन देखील असाच चर्चेचा विषय राहिलेला आहे. हे पर्व आता चांगलेच रंगत आले आहे. आता पर्यंत अनेक धमाके घरात झाले असून इथून पुढेही नक्कीच होतील. सदस्य नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय राहतात. आताही असाच एक विषय वर आला आहे. यात अरबाझ त्याचं एक गुपित सांगतोय. त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत यावेळी खुलासा केला आहे. 

बिग बॉसच्या घरात अरबाझ आणि निक्की यांच्यात काही दिवसांपूर्वी प्रेमाचे वारे वाहताना दिसत होते.दोघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत होते. अरबाझ ने निक्कीला इम्प्रेस करण्यासाठी टमाट्याचे हार्ट सुद्धा बनवले होते.पण सोशल मिडीयावर मात्र अशा चर्चा आहेत कि अरबाझ ने दाखवलेलं हे प्रेम खोटं आहे. अरबाझ नाटकी आहे. याचं कारण म्हणजे नुकतेच एका नवीन प्रोमो मध्ये अरबाझनर एक धक्कादायक खुलासा केला आहे, अरबाझ या प्रोमो मध्ये म्हणाला आहे कि तो कमिटेड आहे 

झालं असं की, बिग बॉसच्या घरात कलर्स वाहिनीवर सुरु होत असलेल्या एका नव्या मालिकेचे कालाकार आले होते. रुमानी खरे, अंबर गणपुळे, शिल्पा नवलकर या तिघांनीही एक टास्क घरात यावेळी खेळला. यावेळी रुमानी खरे हिने, घरातल्या पुरुष सदस्यांना प्रश्न विचारणारा एक गेम खेळला. या खेळादरम्यान अरबाझ ला प्रश्न विचारला गेला. घरात तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचं काय वाटतं, प्रेम की गेम ? त्यावर अरबाझ म्हणाला गेम. कारण प्रेम करून बघितलं, पण ते गेम सारखंच वाटतंय. त्यामुळे आता मी माझा गेम दाखवणार.  

यानंतर दुर्गाने अरबाझला दुसरा प्रश्न विचारला, संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय आणि त्याचं खरं उत्तर तुम्हाला द्यायचंय. तुम्ही सिंगल आहात की कमिटेड ? त्यावर अरबाझ ने चटकन उत्तर दिलं की तो कमिटेड आहे ! आता अरबाझच्या या उत्तरामुळे निक्की आणि त्याच्या नात्यात दुरावा येणार का आणि याचा निक्की वर कसा परिणाम होणार आहे हे बघावं लागेल. बिग बॉस पूर्वी अरबाझने तो लिझा बिंद्रा बरोबर रिलेशनशिप मध्ये असल्याचं सांगितलं होतं. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

तुम्ही पुन्हा लग्न कराल का ? पहा काय म्हणाला आमिर खान…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा