सध्या बिग बॉसच्या पाचव्या सिझनची सगळीकडे हवा आहे. नवनवीन सदस्यांमुळे हा सिझन चर्चेचा विषय राहत आहे. सध्या सूरज चव्हाणची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत व्हिडियो बनवून त्याने भरपूर फॉलोवर्स आजवर मिळवले आहेत.त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याला बिग बॉस मध्ये यायची संधी मिळाली. यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगीतलं.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या क्लीप मध्ये. सुरजने त्याचे वडील गेल्यानंतर त्यांच्या कठीण परिस्थिती बद्दल सांगितलं. खरंतर सूरजचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर आणि अवघड राहिलेला आहे. त्याला या मंचावर बघून खरतर अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. सूरजने सांगितलं की, माझ्या वडिलांचं मी लहान असतानाच निधन झालं होतं. वडील गेले तेव्हा मी गोट्या खेळत होतो. कुणीतरी मला येऊन सांगितलं की, तुझे अप्पा गेले. मी पळत घरी गेलो. मला रडायलाच आलं नाही. त्यामुळे मला लोकांनी नवे देखील ठेवली.
वडिलांविषयी सूरजने सांगितलं की, माझ्या अप्पांनी सढळ हाताने प्रत्येकाची मदत केली. एखादा गरीब माणूस जरी दारात आला तरी भरल्या ताटावरून उठून त्यांनी त्याला मदत केली. स्वतः उपाशी राहून समोरच्या माणसाला माझा बाप जेवायला देत असे. आई-वडिलांची खूप आठवण येते, आणि मग मला खाण्याची इच्छा होत नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र’, वर्षा उसगावकरांचा झालेल्या अपमानावर रिल लाईफ मुलाची संतापजनक प्रतिक्रिया
‘बिग बॉस’मधील अनिल कपूरचे होस्टिंग प्रेक्षकांना कसे वाटले? सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु