Wednesday, March 29, 2023

रणधीर कपूर यांनी हलाखीच्या परिस्थितीचा केला खुलासा, ‘करिश्मा-करीनाची ट्यूशन फी द्यायला पण…’

बॉलिवूड सेलिब्रिटी बहिणी करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर एकमेकांवर प्रेम करण्यासाठी कधीही मागे हटत नाहीत. दोघीही त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. या दोघी बहिणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक क्षणाचे फोटो शेअर करत असतात. त्याचबरोबर कपूर बहिणींचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता यांच्याशी खूप चांगले बॉण्डिंग आहे. ज्याची झलक सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून दिसते. परंतु मोठे अभिनय कुटुंब आणि अभिनेता असूनही, रणधीर कपूर यांना आपल्या मुलींचे संगोपन करणे सोपे नव्हते. 

एका थ्रोबॅक मुलाखतीत अभिनेते रणधीर कपूर यांनी आपल्या अडचणीबद्दल सांगितले होते. यादरम्यान ते म्हणाले होते की, “कलाकारांना आज पैसे कमवणे खूप सोपे झाले आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा पैसे कमावणे खूपच कठीण होते.” त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, “माझ्या मुलींचे म्हणजेच करीना आणि करिश्मा यांच्या शिक्षणासाठी, वीज बिल भरण्यासाठी आणि माझ्या पत्नीचा खर्च भागवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते.”

Photo Courtesy : Instagram/dabookapoor

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, “कलाकार आजकाल किती पैसे कमवतात. आम्ही पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत घेत होतो. मला अभिनयातून मिळवलेले पैसे माझ्या मुलींचे शिक्षण करण्यासाठी, घराचे वीज बिल भरण्यासाठी, पत्नी बबिताचा खर्च, माझे स्कॉच आणि इतर बिले भरण्यासाठी पुरेसे नव्हते.”

ते पुढे म्हणाले की, “आजचे कलाकार हे आपल्या कामाबद्दल खूप निवडक झाले आहेत. हे कलाकार वर्षाला फक्त एकच चित्रपट करत असतात. याचे मुख्य कारण असे की, ते एंडोर्समेंट, कार्यक्रम आणि इतर मार्गांनी देखील पैसे कमावत असतात. आम्ही वर्षाला फक्त एक चित्रपट करू शकत नसायचो. कारण जर आम्ही काम केले नाही, तर आमच्याकडे घर चालवण्यासाठी आणि सगळे बिल भरण्यासाठी पैसे नसायचे. त्यामुळे आम्हाला काम करावेच लागतील होते.”

रणधीर कपूर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याचबरोबर त्यांचा अभिनयक्षेत्रात शेवटचा चित्रपट ‘सुपर नानी’ हा होता. त्याचबरोबर त्यांनी ‘हाऊसफुल्ल १ आणि २’मध्येही आपली भूमिका साकारली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॅटरिनाचा मोठा गौप्यस्फोट! पार्टनरचा फोन करायची चेक, दिवाळी पार्टीत पब्लिक बाथरूममध्ये फोडलेला हंबरडा
‘खिलाडी’ अक्षय कुमारकडून भारताचा अपमान! वकिलाने थेट गृह मंत्रालयाकडे केली तक्रार

हे देखील वाचा