Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

HBD ‘जुम्मा-चुम्मा’ गर्ल : करिअरच्या शिखरावर असतानाच किमी काटकर यांनी सोडले बॉलिवूड, सध्या पुण्यात…

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘हम’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील ‘जुम्मा जुम्मा’ हे गाणे आजही पूर्वीसारखेच प्रसिद्ध आहे. हे गाणे अभिनेत्री किमी काटकर (Kimi Katkar) यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

किमी त्यांच्या डान्स आणि बोल्ड स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध होत्या. शनिवारी (११ डिसेंबर) किमी त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. किमी यांनी वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. परंतू करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी इंडस्ट्री सोडली. आज किमी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

टार्जन गर्ल म्हणून मिळाली होती ओळख

किमी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘पत्थर दिल’ या चित्रपटातून केली होती. यानंतर त्या ॲडव्हेंचर ऑफ टार्जनमध्ये दिसल्या. या चित्रपटाने किमी यांना इंडस्ट्रीत वेगळी ओळख दिली. या चित्रपटात त्यांनी टार्जन गर्लची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर त्या टार्जन गर्ल म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

जुम्मा-चुम्मा गर्ल म्हणून आहे प्रसिद्ध 

‘हम’ या चित्रपटात किमी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. ‘हम’मध्ये त्यांनी अमिताभ यांच्यासोबत डान्स केला होता. या चित्रपटात किमी यांनी अमिताभ यांच्यासोबत ‘जुम्मा-चुम्मा दे दे’ या गाण्यावर डान्स केला होता. तेव्हापासून त्यांना जुम्मा-चुम्मा गर्ल म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. या चित्रपटात अमिताभ आणि किमी यांच्यासोबत रजनीकांत, गोविंदा, अनुपम खेर आणि डॅनी जोम्पा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटादरम्यान किमी केवळ २६ वर्षांच्या होत्या.

इंडस्ट्रीचा घेतला निरोप 

या चित्रपटानंतर किमी यांनी पुण्यातील ॲड फिल्ममेकर शंतनू शौरीशी लग्न केले. लग्नानंतर त्यांनी इंडस्ट्रीला अलविदा केला आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये स्थायिक झाल्या. अनेक वर्षे मेलबर्नमध्ये राहिल्यानंतर किमी भारतात परतल्या आहेत. त्या पती शंतनू आणि मुलगा सिद्धार्थसोबत पुण्यात राहत आहेत.

किमी यांचे खरे नाव नयनतारा काटकर आहे. मात्र इंडस्ट्रीत आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून किमी केले. किमी यांचे खरे नाव खूप कमी लोकांना माहिती आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा