कृती सेनन बनली अमिताभ बच्चन यांची भाडेकरू, दर महिन्याला देणार तब्ब्ल ‘इतके’ रुपये भाडं


अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या कामाने आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने सर्वानाच प्रभावित केले आहे किंबहुना करत आहे. वयाची सत्तरी ओलांडूनही अमिताभ यांचा उत्साह भल्याभल्याना मात देतो. ते जेवढे त्यांच्या कामासाठी ओळखले जातात तेवढेच ते त्यांच्या मोठ्या संपत्तीसाठी देखील ओळखले जातात. अमिताभ यांनी यशासोबतच अमाप संपत्ती जमा केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांची एक प्रॉपर्टी बँकेला भाड्याने दिली आहे. या प्रॉपर्टीमुळे अमिताभ यांना लाखो रुपयांचे भाडे मिळणार आहे.

आता अशी बातमी मिळत आहे की, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कृती सेनन अमिताभ यांच्या याच घरात भाडेकरी म्हणून राहणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या अंधेरीमधील डुप्लेक्स फ्लॅट कृतीने भाड्याने घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार कृतीने या घरासाठी दोन वर्षाचा करार केला आहे. या फ्लॅटसाठी कृतीने तगडी रक्कम सिक्युरिटी मनी म्हणून दिली आहे. शिवाय ती प्रत्येक महिन्याला लाखो रुपये घर भाडे देणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी २०२० साली एका अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी विकत घेतली होती. त्यानंतर २०२१ साली त्यांनी या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन केले. माहितीनुसार या आलिशान डुप्लेक्स फ्लॅटला अमिताभ यांनी तब्ब्ल ३१ कोटी रुपयांना खरेदी केले होते. मुंबईमधील अंधेरी भागातील हा डुप्लेक्स फ्लॅट २७ आणि २८ व्या मजल्यावर आहे.

https://www.instagram.com/p/CWxkftsAz-6/?utm_source=ig_web_copy_link

प्राप्त माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना कृती प्रत्येक महिन्याला दहा लाख रुपये भाडे देणार आहे. तर सिक्युरिटीसाठी कृतीने ६० लाख रुपये दिले आहे. या प्रॉपर्टीचा करार झाला असून, हा करार दोन वर्षांचा आहे. अमिताभ यांनी सप्टेंबर महिन्यात त्यांची जुहू येथील प्रॉपर्टी स्टेट बँक ऑफ इंडियाला भाड्याने दिली आहे. अमिताभ यांनी ही प्रॉपर्टी १५ वर्षांसाठी दिली असून, बँकेने त्यांना १२ महिन्यांचा कोट्यवधी रुपयांचा ऍडव्हान्स दिला आहे.

हेही वाचा : 


Latest Post

error: Content is protected !!