Thursday, March 28, 2024

गरिबांना ५०० रुपयांच्या नोटा वाटत होती नेहा कक्कर, अचानक झाले ‘असे’ काही, पळवावी लागली कार

नेहा कक्कर (Neha Kakkar) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अस्वस्थपणे रडताना दिसत आहे. मात्र गायिकेचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते बरेच चिंतेत पडलेले दिसत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत.

नेहाला घेरले गेले
बॉलिवूड गायिका नेहा कक्करचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती कारमध्ये बसून रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे, जिथून नेहा कक्कर जेवण करून बाहेर येत होती. नेहा कक्कर आपल्या कारमधून जात असताना अचानक काही मुले तिथे आली आणि त्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. (neha kakkar was giving 500 rupees not to beggars singer cried)

रडू लागली नेहा
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही मुले नेहाकडे पैसे मागत होती, तेव्हा सुरक्षारक्षक तेथे आले. सुरक्षारक्षकांनी मुलांना हटविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथे आरडाओरडा सुरू झाला. बघता बघताच तिथे एवढा गोंधळ उडाला की, नेहा कक्करचे डोळे पाणावले. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, नेहा कक्कर खूपच घाबरली आणि कारच्या खिडकीकडे पाठी करून बसली.

चाहते संतापले
हा व्हिडिओ पाहून चाहते नाराज झाले आहेत की, तिथे उभे असलेले लोक हा सगळा तमाशा कसे काय बघत होते. सेलिब्रिटीच्या मागेपुढे फिरत राहणाऱ्या पॅपराजींनी या घटनेदरम्यान मुलांना समजावले नाही आणि बाजूलाही का काढले नाही, असा सवाल चाहते करत आहेत. त्याचवेळी ही मुले भिकारी नसून चोर असल्याचेही काही लोक सांगत आहेत. प्रकरण काहीही असो, पण गायिका नेहा कक्करला रडताना पाहून चाहत्यांना खूप दु:ख झालं आहे.

अधिक वाचा –

हे देखील वाचा