सोनू सूद लॉकडाऊनमध्ये असंख्य लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी रात्रंदिवस काम करणारा अवलिया. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक प्रवासी हे त्यांच्या घरांपासून दूर दुसऱ्या ठिकाणी अडकले होता. वाहतुकीची साधने बंद झाल्याने ह्या प्रवाशांना त्यांच्या घरी पोहचवण्याचे काम सोनू सूदने एकही पैसा न घेता केले. शिवाय या काळात बेरोजगार झालेल्या अनेक लोकांना रोजगार मिळावा म्हणून देखील त्याने खूप काम केले अजूनही तो काम आहे. त्याच्या यासर्व समाजउपयोगी कामांमुळे तो खूप चर्चेत आला होता.
आता मात्र सोनू वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सोनू सूदने त्याच्या जुहू येथील निवासी इमारतीत कुठल्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केल्याची तक्रार महापालिकेने जुहू पोलिसांकडे करत कारवाईची मागणी केली आहे. शिवाय सोनूवर महाराष्ट्र रीजन एंड टाउन प्लानिंग एक्टच्या अंतर्गत कारवाईची देखील मागणी केली आहे.
बीएमसीने सोनूवर इमारतीची जागा वाढवल्याचा, त्यात बदल करण्याचा आणि वापरामध्ये बदल करण्याचा आरोप लावला आहे. बीएमसीने त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, “सोनूने स्वतःच जमिनीच्या वापरात बदल केला. शिवाय ठरलेल्या बांधकामापेक्षा जास्त बांधकाम करत, रहिवाशी बिल्डिंगचे रूपांतर रहिवाशी हॉटेलमध्ये केले. यासाठी आवश्यक कोणत्याही परवानग्या सोनुने बीएमसीकडून घेतल्या नाहीये.”
बीएमसीने ४ जानेवारी रोजी पोलिसांकडे सोनू विरोधात तक्रार नोंदवली होती. सोबतच बीएमसीने सोनूवर त्याला पाठवलेल्या नोटिशीला दुर्लक्ष केल्याचे देखील म्हटले आहे. सोनूवर दाखल करण्यात आलेली तक्रार MRTP ऍक्टच्या अंतर्गत केली आहे.
सोनुने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्यावरील हे सर्व आरोप फेटाळत सांगितले की, “मी जागेच्या वापरात बदल करण्यासंदर्भात महापालिकेकडून परवानगी घेतली असल्याचे सांगितले आहे. फक्त महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (MCZMA) या संदर्भातील परवानगी येणे बाकी आहे. कोरोनाच्या संकटामुळे ही परवानगी अद्याप मिळू शकलेली नाही. यात कसलीही अनियमितता नाही.”
कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईनंतर वादात सापडलेल्या मुंबई महापालिकेने आता त्यांचा मोर्चा अभिनेता सोनू सूद यांच्याकडे वळवत त्याच्या विरोधात कारवाईची केली आहे.










