Tuesday, April 23, 2024

अर्पिताला ट्रोल करणाऱ्यांवर आयुषने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘मला माझ्या पत्नीचा…’

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची बहीण आणि आयुष शर्माची पत्नी अर्पिता खान खूप लाइमलाइटमध्ये असते. अर्पिता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो शेअर करत असते. पण, अर्पिताला तिच्या लूकसाठी अनेकदा ट्रोल केले जाते. युजर्स कधी अर्पिताला तिच्या वजनासाठी, तर कधी तिच्या रंगासाठी ट्रोल करतात. अशा लोकांना आयुष शर्माने चोख प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…

आयुष शर्मा (aayush sharma) याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आयुष शर्मा अशा लोकांबद्दल कथन करताना दिसत आहे जाे पत्नी अर्पिताला तिच्या लूकमुळे ट्रोल करतात. आयुष म्हणतो की,’आजच्या युगात फक्त बाह्य सौंदर्याला महत्त्व आहे. मनाच्या सौंदर्याची किंमत उरलेली नाही.’ व्हिडिओमध्ये आयुष ‘टेडएक्स प्लॅटफॉर्मवर आपले भाषण देत आहे. तो म्हणतो, ‘माझी पत्नी अर्पिताला पब्लिक फिगर असल्यामुळे खूप टार्गेट केले जाते. जेव्हा ती ऑनलाइन जाते, फोटो अपलोड करते तेव्हा लोक तिची खिल्ली उडवू लागतात.’

आयुष म्हणाला, “माझ्या पत्नीला तिच्या वाढलेल्या वजनामुळे सतत ट्रोल केले जाते. या लोकांना वाटते की, ती एक सेलिब्रिटी आहे, त्यामुळे तिने इतके लठ्ठ नसावे. अर्पिताने सेलिब्रिटीसारखे डिझायनर कपडे घालावेत. जेव्हा ती सोशल मीडियावर तिचे फोटो टाकते तेव्हा लोक तिला तिच्या रंगासाठी ट्रोल करायला लागतात.”

Aayush on trolling against Arpita
by u/Sonam-Ki-Kutiya in BollyBlindsNGossip

आयुष पुढे म्हणतो की, “मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. आजच्या जगात आंतरिक सौंदर्याला किंमत नाही. आपण किती चांगले व्यक्ती आहात हे कोणालाही जाणून घ्यायचे नाही? लोकांना फक्त बाह्य सौंदर्याची काळजी असते आणि त्यांना तेच पहायचे असते. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. कारण, ती तिच्या रंगाने खूप समाधानी आहे. अशा ट्रोलर्सना तिने कधीही आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. अर्पिता स्वतःच्या अटीवर आयुष्य जगते.”असे आयुष याने पत्नी अर्पिता हिला ट्राेल करणाऱ्याला चाेख उत्तर दिले आहे. (bolllywood actor aayush sharma opened up about wife arpita khan being body shamed says today beauty is no longer internal)

निक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या 16व्या वर्षी अशी दिसत होती ‘शकुंतलम’ अभिनेत्री, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क
दमदार अंदाजमध्ये तलवारबाजी करताना दिसली सुश्मिता सेन, व्हिडिओ शेअर करत लिहिले…

हे देखील वाचा