Saturday, March 2, 2024

सिक्वेलसाठी नव्हे तर ‘या’ प्रोजेक्टसाठी ‘3 इडियट्स’चे स्टार आले एकत्र, चाहत्यांमध्ये संचारला उत्साह

अलीकडेच सोशल मीडियावर ‘3 इडियट्स‘च्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली हाेती. करीना कपूर खानने आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या पत्रकार परिषदेच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करून 3 इडियट्सच्या सीक्वलबाबत इशारा दिला हाेता. या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची बातमी कळताच चाहतेही खूश झाले हाेते. मात्र, आता या व्हिडिओ मागचे सत्य समोर आले आहे.

अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिने अलीकडेच त्यांच्या पत्रकार परिषदेतील एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि तिघी तिच्याशिवाय ‘3 इडियट्स’चा सिक्वेल तयार करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली हाेती. मात्र, अभिनेत्रीने याबाबत कन्फर्मेंशन दिले नव्हते. त्याच व्हिडीओमध्ये तिने बोमन इराणीचाही उल्लेख केला होता की, जर त्यांना माहित नसेल तर त्यांना याबद्दल सांगावे लागेल. असे अभिनेत्री म्हणाली हाेती. अशात आता 3 इडियट्सचा सीक्वल खरंच बनतोय की नाही, यावर खुद्द तिघांनीच खुलासा केला आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी लोकांना गोंधळात टाकताना दिसत आहेत. तो म्हणतो, “मला माहित आहे की, तुम्ही लोक काय विचार करत असाल की, आम्ही एक्टर्स क्रिकेटपटूंच्या पेहरावात काय करतो आहोत.” यानंतर तिन्ही कलाकार पत्रकार परिषद घेण्यामागचा खरा उद्देश सर्वांना सांगताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

खरे तर, आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांचा हा व्हिडिओ ‘ड्रीम 11’ची जाहिरात आहे. तिन्ही कलाकार क्रिकेटबद्दल बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या तिघांचेही म्हणणे आहे की, आजकाल क्रिकेटर्स खूप अभिनय करत आहेत. त्यामुळेच आता कलाकार क्रिकेट खेळतील अशी योजनाही त्यांनी आखली आहे.

पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ आर माधवनने शेअर केला आहे. यामध्ये तिन्ही कलाकार क्रिकेटर्सची मजेशीर पद्धतीने खिल्ली उडवताना दिसत आहेत. शेवटी, आमिर म्हणतो की, ‘आता एक्टर्स आणि क्रिकेटर्स आमनेसामने असतील.’, जे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत.(bollywood actor aamir khan r madhavan sharman joshi press conference for team actors against cricketers and not 3 idiots sequel)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्फी जावेदने बनवला टॉयलेट पेपरपासून ड्रेस; संतप्त यूजर्स म्हणाले; ‘रमजानमध्ये तरी…’

‘मी त्याला बजावले होते स्वतःला…’ स्मृती इराणी यांनी दिला सुशांत सिंगच्या आठवणींना उजाळा

हे देखील वाचा