Monday, April 15, 2024

मलायका अरोराच्या प्रेमात पडलेला अर्जुन बर्लिनच्या रस्त्यावर बनला मजनू, फाेटाे व्हायरल

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या बर्लिनला सुट्टयांचा आनंद घेत आहे. दोघेही बर्लिनच्या रस्त्यांवर वेळ घालवताना दिसत आहेत. अशात अर्जुन कपूरने आता मलायका अरोरासोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत असू चाहते त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अर्जुन कपूर (arjun kapoor) याने मलायका अरोरा (malaika arora) सोबत ब्लॅक अँड व्हाइट आणि कलरफुल फोटो शेअर केले आहेत. दोन्ही फोटोंमध्ये ते एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. दोघेही शहरात फिरत आहेत आणि महत्त्वाच्या ठिकाणांची फाेटाे अपलोड करत आहेत. फोटो शेअर करताना अर्जुन कपूरने लिहिले, ‘प्रेमाने.’ यासोबत त्याने रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. त्याच्या या फोटोंवर कमेंट करताना, मलायका अरोरा हिने रेड हार्ट आणि ब्लॅक हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

पहिल्या दोन फोटोंमध्ये अर्जुन आणि मलायका अरोरा बर्लिनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘तुम्ही लोकांनी लग्न करावे’, तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, ‘तुमचे नाते खूप स्ट्राॅंग आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलयचे झाले, तर अर्जुनचा मागील चित्रपट ‘डॉग्स’ होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आस्मान भारद्वाज यांनी केले होते. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, तब्बू आणि कोंकणा सेन शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. तो लवकरच ‘मेरी पत्नी ‘च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

मलायका अरोराने अर्जुन कपूरला डेट करण्यापूर्वी अरबाज खानपासून घटस्फोट घेतला होता. तिला तिच्यापासून एक मुलगाही आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी अद्याप लग्नाच्या तारखेची पुष्टी केलेली नाही. परंतु 2023 मध्ये दोघे लग्न बंधनात अडकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, मलायका अरोरा याआधी म्हणाली हाेती की, दोघेही त्यांचे नाते पुढे नेण्यासाठी तयार आहेत. यानंतर लग्नाबाबत चर्चा सुरू झाली. मलायका अरोरा अर्जुन कपूरपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.(bollywood actor arjun kapoor malaika arora latest romantic photos from berlin goes viral )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फटाकडीच दिसते राव! अमृताने शेअर केले ऑफ शाेल्डर ड्रेसमध्ये फाेटाेशूट, एकदा पाहाच

अधुरी प्रेम कहाणी! या व्यक्तीमुळे आला ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यात दुरावा

हे देखील वाचा