Tuesday, January 31, 2023

‘भगवा रंग शिवसेनेच्या झेंड्यातही…’, दीपिकाच्या ‘त्या’ गाण्यावर शक्तिमानची संतप्त प्रतिक्रिया

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या आगामी ‘पठाण‘ चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ हे गाणे रिलीज झाले असून ते रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एकापाठोपाठ अनेक राजकारणी आणि इंडस्ट्रीतील लोकांनी या गाण्यातील दीपिकाच्या लूकचा विरोध केला आहे. आता या यादीत नव्या नावाची भर पडली आहे. आता टीव्हीवरील ‘शक्तिमान‘ म्हणजेच मुकेश खन्ना यांनीही दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर नाराजी व्यक्त केली आहे.

बेशरम रंगावर प्रतिक्रिया देताना मुकेश खन्ना (mukesh khanna) यांनी शाहरुख (shahrukh khan) आणि दीपिका पदुकोण (deepika padukone) यांच्या गाण्यांना अश्लील म्हटले आहे. माध्यांना दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणतात, “आजची मुलं चित्रपट आणि टीव्ही बघत मोठी होत आहेत. अशा परिस्थितीत सेन्सॉर बोर्डाने या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सेन्सॉर बोर्डाने अशी गाणी पास करू नयेत. सेन्सॉर बोर्ड हे सर्वोच्च न्यायालय नाही, ज्याचा विरोध करता येणार नाही.”

आपला मुद्दा पुढे करत मुकेश खन्ना म्हणाले, “अशी अश्लील गाणी आणली जात आहेत, हे स्पेन नाही तर आपला देश आहे. सध्या अर्ध्या कपड्यात गाणी बनवली जात आहेत. काही काळानंतर ते कपड्यांशिवाय बनवले जाऊ लागतील. मला समजत नाही की सेन्सॉर बोर्ड फक्त या दर्जाची गाणी का पास करतात. भगवा रंग एखाद्या पंथासाठी आणि धर्मासाठी खूप महत्त्वाचा असतो हे त्यांना माहीत नाही का?

मुकेश खन्ना पुढे म्हणतात, “आपण ज्याला भगवा रंंग म्हणतो ते अतिशय संवेदनशील आहे. ज्याला आपण भगवा म्हणतो, ताे शिवसेनेच्या झेंड्यातही आहे. तसेच आरएसएसमध्ये ही आहे. जेव्हा त्यांना ही गोष्ट कळते, मग ते बनवायच्या वेळी काय विचार करुन बनवतात. अमेरिकेत तुम्ही त्यांच्या ध्वजाची बिकिनीही घालू शकता, पण भारत त्याला परवानगी देत ​​नाही.”

‘पठाण’ या चित्रपटाद्वारे शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023ला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे.(bollywood actor mukesh khanna lashes out at besharam rang says censor board should not pass such songs)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निवेदिता सराफ यांना आली लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवडत्या डिशची आठवण, सांगितली खास गोष्ट

‘महाभारत’ या सुरेल उपक्रमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, युट्यूबवर हाेतंय प्रचंड व्हायरल

हे देखील वाचा