Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड दीपिकासोबत घटस्फोटाच्या बातम्यांवर रणवीरने लावला ब्रेक, अभिनेत्रीसोबतचा ‘ताे’ रोमँटिक फोटो केला शेअर

दीपिकासोबत घटस्फोटाच्या बातम्यांवर रणवीरने लावला ब्रेक, अभिनेत्रीसोबतचा ‘ताे’ रोमँटिक फोटो केला शेअर

अभिनेता रणवीर सिंग 6 जुलै रोजी 38 वर्षांचा झाला. रणवीरने आपला खास दिवस पत्नी दीपिका पदुकोणसोबत अलिबागमध्ये साजरा केला. माध्यमातील वृत्तांनुसार, दोघांनी जवळपास एक आठवडा त्यांच्या अलिबागच्या बंगल्यावर घालवला. अशात रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दीपिकासोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही क्रूझवर हसताना दिसत आहेत.

अलीकडेच रणवीर (ranveer singh) याने दीपिका ( deepika padukone) हिच्यासाेबत एक राेमॅंटिक फाेटाे शेअर केला. फाेटाे शेअर करत अभिनेत्याने कॅप्शमध्ये लिहिले की, ‘वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छांबद्दल धन्यवाद.’

Ranveer Singh
Photo Courtesy Instagramranveersingh

मंडळी, दीपिकाने रणवीरला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. यामुळे रणवीरचे चाहते संतापले आणि दीपिकाला जाब विचारू लागले. इतकेच नाही, तर दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे लोक म्हणू लागले. मात्र, काही दिवसांनंतर दीपिकाने रणवीरसाठी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून या बातमीचे खंडन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दोघांची प्रेमकथा
दीपिका आणि रणवीर ‘गोलियों की रासलीला: राम लीला’ दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास 6 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2018 मध्ये लग्न केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर- दीपिकाचा वर्क फ्रंट
रणवीर लवकरच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’मध्ये आलिया भट्टसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. यात जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे, तर दीपिका प्रभास, अमिताभ बच्चन, दिशा पटानी, कमल हसन यांच्यासोबत ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहे. याशिवाय शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातही ती गेस्ट अपीयरेंसमध्ये दिसणार आहे.(bollywood actor ranveer singh shares picture with deepika padukone amid divorce rumours celebrates birthday with wife in alibaugh)

अधिक वाचा-
‘मैं पुण्य हूं या पाप हूं… नाम तो सुना होगा’, शाहरुख खानच्या ‘जवान’चा अ‍ॅक्शन-पॅक्ड दमदार ट्रेलर रिलीज
सिद्धार्थ जाधव सारखा दिसणारा ‘हा’ माणुस तुम्ही पाहायलाय का? पाहा फोटो

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा