Friday, December 1, 2023

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी येतोय ‘टायगर’, सलमानचा आणखी एक खास मॅसेज; एकदा वाचा

प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलामनचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. सध्या सलमान त्याच्या ‘ टायगर 3’ चित्रपटामुळे चागंलाच चर्चेत आला आहे. सलमानच्या आगामी चित्रपट ‘टाइगर 3‘ च्या ट्रेलरची चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच चित्रपटातील अनेक पोस्टर आणि टीझर रिलीज केले आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये सलमान खान ‘टाइगर’ (tiger 3)म्हणून जोरात गर्जना करणार असल्याचे आधीपासूनच सांगितले होते. आता अलीकडेच, बॉलिवूडचा दबंग सलमानने त्याच्या चाहत्यांना आणखी एक धक्का दिला आहे. तो स्टार स्पोर्ट्सवरील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या थेट सामन्यात सहभागी होणार आहे. ‘टायगर 3’च्या प्रमोशनसाठी ब्रॉडकास्ट नेटवर्क, स्टार स्पोर्ट्सशी एक संबंध जोडला आहे. ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण विश्वचषकादरम्यान वाघाची डरकाळी ऐकायला मिळणार आहे.

क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाची एवढी मोठी मार्केटिंग असोसिएशन होत आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या सर्व सामन्यांमध्ये तुम्हाला ‘ टायगर’ची गर्जना ऐकू येईल . यशराजने सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘टायगर 3’ मोठ्या प्रमाणावर प्रमोट करण्यासाठी मार्केटिंग असोसिएशन बनवली आहे, ज्याचा यापूर्वी कधीही प्रयत्न केला गेला नव्हता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

‘टायगर 3’चे पहिले प्रमोशन भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान सुरू होईल. जो 14 ऑक्टोबरला खेळला जाणार असून 16 ऑक्टोबरला या चित्रपटाचा ट्रेलर सर्वांसमोर येणार आहे. सलमान खानने क्रिकेट विश्वचषक 2023 साठी संपूर्ण टूर्नामेंट आणि भारतभर होणार्‍या सर्व महत्त्वाच्या सामन्यांसाठी को-ब्रँडेड प्रोमो शूट केला आहे . विशेषत: भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना 20 कोटींहून अधिक लोक पाहतात. अशा परिस्थितीत 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान ‘टायगर 3’चे प्रमोशन होणार आहे, तेव्हा त्याचा चित्रपटाला खूप फायदा होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. (bollywood Actor Salman Khan movie tiger 3 yash raj film marketing ssociates with star sports in cricket world cup 2023 enter with india vs pakistan match)

आधिक वाचा-
‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ मधील प्रेमगीत प्रदर्शित, सोनाली कुलकर्णी म्हणतेय ‘मी एकटी’
अमेरिकेतून शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल देशपांडे ट्रोल; लोक म्हणाले, ‘ब्राह्मण फक्त…’

हे देखील वाचा