Sunday, December 3, 2023

अर्रर्र! शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात घुसले दाेन भुरटे, सुरक्षा असूनही घटना घडल्याने खळबळ

शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यात मोठा सुरक्षेचा घोळ झाला आहे, ज्याने सर्वांचेच होश उडवले आहेत. बुधवारी (दि. 1 मार्च)ला रात्री दोन तरुणांनी सुरक्षेचा भंग करत ‘मन्नत’ची भिंत उचकटून तिसरा मजला गाठला. मात्र, तेव्हाच सुरक्षारक्षकांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी दोघांना पकडले. हे दोन्ही तरुण गुजरातचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही तरुणांना आता पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात विनापरवानगी आवारात प्रवेश करण्यासह भादंविच्या अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मन्नत बंगल्यातील भिंत स्केलिंग करुन तिसऱ्या मजल्यावर पाेहाेचलेले भुरटे शाहरुख खान (shah rukh khan) याचे माेठे चाहते आहेत.दोघेही त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. सुरुवातीला मन्नतच्या सुरक्षा रक्षकांनी दोघांची विचारपूस केली आणि काही वेळाने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे वय 21 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे.

असे सांगितले जात आहे की, ज्यावेळी हे दोन तरुण ‘मन्नत’मध्ये दाखल झाले, त्यावेळी शाहरुख खान त्याच्या बंगल्यावर उपस्थित नव्हता. हे दोन्ही तरुण गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चौकशीत दोघांनी सांगितले की, ‘ते शाहरुखला भेटायला गुजरातहून आले होते.’

माध्यमातील वृत्तांनुसार, बुधवारी (दि. 1 मार्च)राेजी रात्री ही घटना घडली, त्यावेळी शाहरुख खान ‘जवान’चे शूटिंग करत होता. तो गुरुवारी (दि. 2 मार्च)ला पहाटे परतला आणि झोपायला गेला. त्यानंतर ‘मन्नत’च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आत लपून बसलेल्या दोन्ही तरुणांना पकडले.

मात्र, आतापर्यंतच्या तपासात त्याचा कोणताही चुकीचा हेतू समोर आलेला नाही. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची संपर्क माहिती घेतली असून त्यांना कॉल करत आहेत. गुजरात पोलीस त्यांच्यावर काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? हे देखील तपासणार आहे.(bollywood actor shah rukh khan security mistake men of gujarat break into his bungalow mannat by scaling outer wall police probe on)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकीकडे संपत्तीचे वाद सुरु असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ऑस्कर सोहळ्यामध्ये दीपिका पदुकोण दाखवणार तिचा जलवा, दिसणार ‘या’ भूमिकेत

हे देखील वाचा