Thursday, April 23, 2026
Home बॉलीवूड “शंभर कोटी बजेट असणाऱ्या चित्रपटापेक्षाही ‘ही’ गोष्ट जास्त समाधान देते”, अर्ध्या रात्री केलेल्या सोनू सूदच्या ट्विटने वेधले सर्वांचे लक्ष

“शंभर कोटी बजेट असणाऱ्या चित्रपटापेक्षाही ‘ही’ गोष्ट जास्त समाधान देते”, अर्ध्या रात्री केलेल्या सोनू सूदच्या ट्विटने वेधले सर्वांचे लक्ष

मागच्या वर्षी आलेल्या या कोरोना विषाणूने या वर्षी रौद्र रूप धारण केलेले दिसत आहे. मागच्या वर्षी देखील या विषाणूने थैमान घातले होते. लॉकडाऊनमुळे अनेक पर राज्यातील मजूर प्रवासी भारतात अडकून राहिले होते. या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी अभिनेता सोनू सूदने त्यांना खूप मदत केली होती. त्यांची योग्य ती सोय करून त्यांना घरी पाठवले होते. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये देखील खूप भयावह परिस्थिती उभी राहिली आहे. आता रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. पण वैद्यकीय सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. यासाठी अनेकजण मदत करत आहे. सोनू सूद देखील नेहमीच मदत करण्यासाठी तयार असतो. अशातच सोनू सूदने एक ट्वीट केले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सोनू सूदने ट्वीट केले आहे की, “अर्ध्या रात्री आलेल्या अनेक फोननंतर जर तुम्ही कोरोना रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था करून त्यांचा जीव वाचवत असाल, तर शप्पथ ही शंभर (१००) कोटी बजेट असणाऱ्या चित्रपटात काम करण्यापेक्षाही जास्त समाधानाची गोष्ट आहे. आम्हाला झोप नाही येत जेव्हा रुग्णालयाच्या बाहेर बेडसाठी अनेकांच्या रांगा लागलेल्या असतात.”

सोनू सूदला देखील कोरोनाची लागण झाली होती. पण तो एका आठवड्यातच कोरोनावर मात करून घरी परतला होता.

अलीकडेच काही दिवसात सोनू सूदने सांगितले होते की, तो मोफत कोव्हिड- १९ची मदत करणार आहे. त्याने या गोष्टीची माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. त्याने ट्वीट केले होते की, “तुम्ही आराम करा, मी टेस्ट करतो.”

Healwell 24 आणि krsnaa diagnostic Pvt. Ltd. सोबत एक फ्री कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार आहे. सोनूने एक टेम्प्लेट शेअर केले आहे आणि यात संपूर्ण माहिती दिली आहे. यात तुम्हाला घरबसल्या सेवा पुरवण्यात येणार आहेत. यासाठी तुम्ही डॉक्टरांची परवानगी घेऊ शकता यासाठी एक टोल फ्री नंबर देखील दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धर्मेश इज बॅक! कोरोनावर मात करत कोरिओग्राफर पोहोचला ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावर

-दिवंगत अभिनेते इरफान खान आधीच समजले होते मरणार आहे, शेवटच्या वेळी मुलाला म्हटले असे काही, तुम्हालाही येईल रडू

-भारीच ना भावा! ‘बिग बॉस १४’नंतर राहुल वैद्यच्या मानधनात वाढ, ‘खतरों के खिलाडी’त एका एपिसोडसाठी घेणार सर्वाधिक रुपये

हे देखील वाचा