वरुण धवन- नताशा दलालचा विवाहसोहळा संपन्न, पाहा लग्नाचा संपुर्ण अल्बम


बालपणीचे मित्र-मैत्रीण असलेल्या बॉलीवूड अभिनेता वरुण धवन व नताशा दलाल यांचा रविवारी विवाहसोहळा संपन्न झाला. मोजक्याच जवळ्याच मित्रपरिवारासोबत हा विवाहसोहळा अलिबाग येथे पार पडला. वरुण-नताशाच्या लग्नाची चर्चा चाहत्यांमध्ये गेली अनेक दिवस होती. आता हे लग्न झाल्यानंतर चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे.

संध्याकाळी ६ वाजता हा लग्न सोहळा पार पडल्यानंतर लग्नात आलेल्या पाहुण्यांना मोतीचूर लाडू भरवत नताशा-वरुणने सर्वांचे तोंड गोड केले. तसेच लग्न ज्या रिसोर्टला झाले त्याच्या बाहेर आलेल्या सर्व लोकांना व मीडियातील लोकांना वरुण-नताशाने लाडू पाठवले तसेच दोघेही काही वेळासाठी मीडियाला फोटो द्यायला बाहेर आले होते.

रात्री ११ वाजता इंस्टाग्रामच्या माध्यमातून फोटो शेअर करत वरुणने लग्नाची अधिकृत माहिती दिली. वरुण इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहीतोय, ‘आयुष्यभराच प्रेम अधिकृत झालं.’ या पोस्टमध्ये वरुणने दोन फोटो शेअर केले आहेत. एकात तो नताशाबरोबर लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त दिसतोय तर दुसऱ्यात तो फेरे घेताना दिसत आहे.  ८ तासांत या फोटोंनी तब्बल ३० लाख लाईक्सचा टप्पा पार केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लग्न कोणत्याही अडथळ्यांशिवाय व्यवस्थित पार पडलं. हे लग्न एकूण तीन दिवस चाललं. तसेच लग्नात आलेल्या सर्वच पाहुण्यांनी खूप मजा केली. तसेच लग्न व्यवस्थित पार पडल्यामुळे सर्वजण आनंदी होते.

ज्या मेंशन हाऊस रिसोर्टमध्ये वरुणच लग्न झालं त्याच्या आतच वरुणची वरात निघाली होती. आपल्या बायकोला नेण्यासाठी वरुण वरातीत Quad Bike या टूव्हिलरवर आला होता. सलमान खानच्या सलामे इश्क चित्रपटातील तनू लेके मै जावांगा गाण्यावरच वरुणने वरातीत इंट्री घेतली होती.

लग्नातील ड्रेसबद्दल बोलायचं झालं तर नताशाचा लेहंगा तीने स्वत:च डिझाईन केला होता. बोंबाबोंबच्या चाहत्यांना सांगायला आवडेल की नताशा स्वत: एक उत्कृष्ट फॅशन डिझाईनर आहे. दुसऱ्या बाजूला वरुणच्या शेरवाणीची डिझाईन प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राने केली होती.

लग्नात आलेल्या पाहुण्यांचा विचार केला तर फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा, दिग्दर्शक कुणाल कोहली, दिग्दर्शक करण जोहर व अभिनेत्री जोआ मोरानी यांचा समावेश होता. तसेच दोन्ही परिवारांचे जवळचे नातेवाईकही लग्नासाठी आले होते. लग्नात कॉंटिनेंटल व पंजाबी पद्धतीचे जेवण ठेवण्यात आले होते.

वरुण आणि नताशा हनिमूनसाठी तुर्की देशात जाणार असून इंस्तांबूल शहरातील Ciragan Palace मध्ये ते थांबणार आहेत. हा पॅलेस एक लक्झुरी पॅलेस म्हणून तुर्की देशात ओळखला जातो. या ठिकाणी आजपर्यंत अनेक सेलीब्रेटी राहिले असून तो सेलिब्रेटींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.