Monday, April 15, 2024

‘मैं हूं ना’च्या शूटिंगदरम्यान फराहने जायेदला शिवीगाळ करत मारून फेकली चप्पल, अभिनेताने केला धक्कादायक खुलासा

बॉलीवूड अभिनेता झायेद खानने ‘मैं हूं ना‘ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात शाहरुख खान, सुष्मिता सेन, अमृता रॉय यांच्यासह अनेक स्टार्स लीड रोलमध्ये होते. दरम्यान, आता झायेद खान याला चित्रपटाच्या शूटिंगचे दिवस आठवले आहेत. चित्रपटाच्या रिलीजच्या 19 वर्षांनंतर, झायेदने शूटिंग दरम्यान सेटवर फराह खानने त्याच्याशी कसे वागली हे सांगितले.

झायेद खान (zayed khan) याने नुकतीच माध्यमाना मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी ‘मैं हूं ना’च्या शूटिंगशी संबंधित अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या. झायेदने सांगितले की, ‘फराह खान चित्रपटाच्या सेटवर त्याच्यावर चांगलीच ओरडली. एवढेच नाही, तर त्यांनी झायेदला खूप शिवीगाळ करत चप्पलही फेकून मारली.’

तर झाले असे की, मुलाखतीदरम्यान झायेद खानला विचारण्यात आले की, चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘चले जैसे हवाएं’चे शूट पूर्ण करण्याचा त्याचा अनुभव कसा होता? त्याच्यासाठी हे सोपे होते का? या प्रश्नावर झायेद म्हणाला, ‘तो काळ होता जेव्हा आम्ही डिजिटलवर नव्हे तर 400 फूट चित्रपटावर शूटिंग करत होतो. त्यामुळे असे नव्हते की, जितके टेक पाहिजे तितके घ्या. सेटवर एक डिसिप्लिन होते. एक टेक दिल्यानंतर अवस्था खराब व्हायची. मला आठवतं की, शूटिंगदरम्यान कॅमेराने अमृता रावला कैद केलं होतं आणि ती माझ्याकडे येत होती. माझ्या सभोवतालचे प्रत्येकजण तयार रहा, तयार रहा, तयार रहा म्हणत हाेते. मात्र, कॅमेरा माझ्या दिशेने वळला तसे माझ्या शेजारी नाचणाऱ्या बॅकग्राउंड डान्सर्सपैकी एक खाली पडला आणि माझा नंबर येताच मी कट बाेललाे.’

झायेद खानने सांगितले की, ‘फराह खानने नकार दिल्यानंतरही मी कट दिला. कारण, डान्सर पडला होता. यामुळे फराहला इतका राग आला की, तिने मला शिवीगाळ केली आणि तिची चप्पलही फेकूण मारली. यानंतर मी फराहला म्हणालो की, तू माझ्याकडून कशी अपेक्षा करू शकतेस की, कोणी मरत आहे आणि मी तरीही त्याच्यावर डान्स करू. यानंतरही फराह ओरडत म्हणाली, माझ्याशिवाय सेटवर कोणीही कट बोलणार नाही. नंतर आम्हाला कळले की, ताे डान्सर ठिक आहे. मग आम्ही ते गाणे पुन्हा केले आणि ते अगदी सहजतेने झाले.’

झायेद खान याच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलयाचे झाले, तर त्याने ‘वादा’, ‘मै हूं ना’, ‘अंजाना अंजानी’, ‘ब्लू’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actor zayed khan reveals farah khan abused and threw her chappal on me during main hoon na hit song chale jaise hawaien shooting set )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ दिग्गज गायकाच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पोलिसांची एन्ट्री, स्टेजवर जात गायकाला गाणे गाण्यापासून रोखले

रवीनाने ‘एक दो तीन’ गाण्यावर डान्स करत माधुरीला दिले चॅलेंज; ‘धक धक गर्ल’ म्हणाली…

हे देखील वाचा