Friday, April 19, 2024

सुपरहिट ‘ताल’ चित्रपटाला २३ वर्ष पूर्ण, ‘ताल २’ बद्दल केली महत्वाची घोषणा

बॉलीवूडमधील प्रथितयश दिग्दर्शक म्हणून सुभाष घई यांचे नाव घेतले जाते. त्यांनी आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती बॉलीवूडला दिल्या आहेत. ते एक यशस्वी निर्माते देखील आहेत. बॉलीवूडला उत्तमोत्तम अभिनेते देण्याचे श्रेय घई यांना जाते. त्यांचे सिनेमाचे वेगळेपण चाहत्यांच्या मनात कायम आहे. सुभाष घई 77 वर्षांचे झाले आहेत, पण आजही लोक त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतात. काही चित्रपट असे आहेत, ज्यांच्या पार्ट 2 ची मागणीही अनेकदा झाली आहे. ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर स्टारर ताल हा चित्रपट देखील त्यापैकीच एक आहे. बॉलीवूडच्या शोमनच्या चमकदार आणि यशस्वी चित्रपटांपैकी एक, ‘ताल’ 23 वर्षांपूर्वी या दिवशी प्रदर्शित झाला होता. या 23 वर्षात अनेकवेळा चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा झाली, पण त्यासाठी सुभाषची एक अट होती.

13 ऑगस्ट 1999 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ताल’ चित्रपटाचे दिग्दर्शन करुन सुभाष घई (Subhash Ghai) यांनी इतिहास रचला होता. ए आर रहमानच्या संगीताने सजलेल्या या चित्रपटातील सर्व गाणी अतिशय मधुर आहेत. 23 वर्षांपूर्वी मुक्ता आर्टस प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेला ताल हा संगीतमय चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत सुपरहिट ठरला होता रिलीज झाल्यानंतर अनेक वर्षांनी त्याचे संगीत अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजत होते. या चित्रपटाची कोरिओग्राफी सरोज खान (Saroj Khan) सारख्या प्रसिद्ध कोरिओग्राफरने केली होती आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) खूप सुंदर होती. 

मी फक्त पैसे कमावण्यासाठी सिक्वेल बनवणार नाही
सुभाषचा एकही चित्रपट बरयाचं काळापासून आला नसला तरी संगीत असो वा चित्रीकरण किंवा ‘ताल’ची कथा, प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर बनलेली आहे की लोकांना ताल 2 पाहावासा वाटचो. काही वर्षांपूर्वी यांवर बोलताना सुभाष घई यांनी एक अट घातली होती की,’पहिल्या भागाहून ही उत्तम कथा मिळाल्यावरचं मी दुसरा भाग करेन.’ सुभाष घई म्हणाले होते की, बहुतेक चित्रपट निर्माते त्यांच्या आधीच्या चित्रपटांच्या यशाचा फायदा घेतात. माझा असा विश्वास आहे की, चित्रपटाची कथा चांगली असेल तर तो बनवण्यात काही हरकत नाही, पण चांगल्या कथेशिवाय बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी चित्रपट बनवणे म्हणजे प्रेक्षकांची फसवणूक आहे. मी नेहमी नवीन कथांसह चांगले चित्रपट बनवण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळेच मी ‘ताल 2’ तेव्हाच बनवेन जेव्हा मला ताल पेक्षा चांगली कथा मिळेल.

सुभाष घई यांना असेचं शोमैन म्हटले जात नाही
आज हिंदी चित्रपटसृष्टी सतत मार खाणाऱ्या चित्रपटांमुळे चिंतेत आहे. अशा परिस्थितीत जुन्या दिग्गज चित्रपट निर्माते- दिग्दर्शकांकडूनजी खूप काही शिकायला पाहिजे. सुभाष घई हे असे दिग्दर्शक मानले जातात जे त्यांचे चित्रपट बनवण्याआधी कथा, संगीत यातून अभिनेता-अभिनेत्री कोण असेल याचा विचार मनात ठेवतात. त्याने ‘ताल’ बनवायचे ठरवले तेव्हाही असेच काहीसे घडले.

गोविंदाने नकार दिल्यानंतर अनिल कपूरला संधी मिळाली
या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि अक्षय मुख्य भूमिकेत होते पण त्यांना गोविंदाला सहाय्यक अभिनेता म्हणून घ्यायचे होते. गोविंदाने काही कारणास्तव नकार दिल्यावर सुभाषने इतर अनेक कलाकारांना ही भूमिका ऑफर केली. जेव्हा दोन-तीन अभिनेत्यांसोबत काही जमले नाही तेव्हा शेवटी त्याने अनिल  कपूर(Anil Kapoor) याला ऑफर दिली आणि त्याने चित्रपट साइन केला. ‘रमता जोगी’ या चित्रपटातील एक हिट गाणे त्यांच्यावर चित्रित झाले आणि ते इतके हिट झाले की, अनिलला ते गाणे आजही स्मरणात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

बाबो! सर्वांसमोरच हनी सिंगने सनीबद्दल केले धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘मी तिचे सगळे…’

रतन राजपूतने स्वत:बाबत केला धक्कादायक खुलासा, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

सलमानने मारलेल्या काळवीटाचे उभारणार भव्यदिव्य स्मारक, बिश्नोई समाजाची घोषणा

हे देखील वाचा