Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड ‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूडसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूडसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा दोन दिवस मुंबईत चालला. यावेळी अनेक बडे राजकारणी आणि कलाकार सहभागी झाले होते. हॉलिवूडपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींनी दुसऱ्या दिवशी ऑडिटोरियमध्ये डान्स परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, वरुण धवन, आलिया भट्ट आणि रश्मिका मंदान्ना स्टेजवर आपली दमदार परफॉर्मन्स दाखवताना दिसले.

एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील ‘नाटू- नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. अशात आता या गाण्याची गूंज नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्येही ऐकू आली. या गाण्यावर आलिया भट्ट (alia bhatt) हिने साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत डान्स केला. या व्हिडिओमध्ये आलिया शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे, तर रश्मिका साडीमध्ये नाटू-नाटूची हुक स्टेप करताना दिसत आहे.

बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात नाचणार नाही हे शक्य नाही. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात अभिनेत्याने ‘पठाण’ चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यादरम्यान शाहरुखसाेबत रणवीर सिंग आणि वरुण धवननेही ‘पठाण’ची हुक स्टेप करताना दिसले. शाहरुख इथेच थांबला नाही, तर त्याने या कार्यक्रमात त्याची आयकॉनिक पोजही दिली.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC)च्या उद्घाटन कार्यक्रम साेहळ्यात सलमान खान, रेखा, जान्हवी कपूर, दिशा पटनी, श्रद्धा कपूर, गौरी खान, प्रियांका चोप्रा, आर्यन खान शिबानी दांडेकर, फरहान अख्तर, कनिका कपूर, भूमी पेडणेकर, नीना गुप्ता यांच्यापासून ते सर्व बॉलिवूड स्टार्स या कार्यक्रमात सामिल झाले हाेते. हा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘इंडिया इन फॅशन’ नावाने आयोजित करण्यात आला होता.(bollywood actress alia bhatt and rashmika dance naatu naatu and shahrukh did jhoome jo pathan on nita ambani gala 2nd day)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनेक रात्र रस्त्यांवर उपाशी काढलेला रेमो, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, वाचा त्याची संघर्षमय कहाणी

‘भोला’नंतर पुन्हा ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार अजय आणि तब्बूची सुपरहिट जोडी

हे देखील वाचा