‘जितका तो मैदानात आक्रमक दिसतो…’, विराट कोहलीच्या स्वभावाबद्दल पत्नी अनुष्का शर्माचा खुलासा


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. काहीवेळा मैदानात पण तो अनेकांना असा दिसला आहे. कित्येकदा त्याच्या या आक्रमक शैलीमुळे त्याला अनेक टीकांचा सामना करावा लागला होता. क्रिकेट सामन्यात खेळताना त्याच्या या आक्रमकतेमुळे प्रेक्षकांना त्याच्यावर चीड देखील यायची. पण त्याचा हा स्वभाव आता फारसा कमी झाला असल्याचे बोलले जातेय. याचे मुख्य कारण काहींना नक्कीच माहीत असेल, किंबहुना नाही देखील.

विराट कोहली किकेटच्या मैदानात जितका आक्रमक दिसतो, त्याच्या वास्तविक जीवनात तो खूप शांत असल्याचे त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सांगितले आहे. सद्यस्थितीत अनुष्का आणि विराटची जोडी ही जगातील सर्वोत्तम जोडीपैकी एक मानली जाते. त्यांची ही जोडी सतत काहीना काही गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असते. अनुष्कासोबत लग्न झाल्यावर विराट कोहलीचा आक्रमक स्वभाव काहीसा कमी झालेला दिसून आला. त्यांनी एकमेकांसोबत अनेकदा वेळ व्यतीत केला होता. पण त्यातच अनुष्काच्या एक मुलाखतीमुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली.

विराटने आपल्या आक्रमक अशा फलंदाजीने लाखो नव्हे, तर करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्याने आपल्या आयुष्यात आणि आक्रमक अशा स्वभावात बदल झाल्याचे श्रेय कित्येकदा अनुष्का शर्माला दिले आहे, काहीवेळा त्याने हे अनेक प्रसारमाध्यमांशी मुलखतीदरम्यान बोलून देखील दाखवले आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माने ‘फिल्मफेअर’ ला दिलेल्या एका मुलाखतीत आपला पती विराट कोहलीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, “विराट अतिशय शांत आहे. मैदानाबाहेर तो अतिशय संयमी असतो. तुम्ही माझ्या मित्रमंडळींना आणि माझ्या सहकार्‍यांना विचारा ते तुम्हाला देखील हेच सांगतील. खऱ्या आयुष्यात तो आक्रमक नाही, पण मैदानामध्ये मात्र आक्रमक असतो. त्याला क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. त्याच्यासाठी हे एका स्वप्नासारखे आहे. मी देखील जेव्हा त्याच्याकडे पाहते, तेव्हा त्याचा संयम आणि शांतपणा पाहून मी पण आश्चर्यचकित होते. अनेकदा मी विराटला ‘यू आर सो चिल’ असे म्हटले आहे.”

हे सिलिब्रिटी जोडपे एकमेकांची स्तुती करायला कधीच थकत नाहीत. अलीकडेच ते आई- बाबा झाले असून, एक अनुष्काने गोंडस परीला जन्म दिला आहे. त्यांच्या मुलीचे नाव ‘वामिका’ आहे. हे दोघे आपल्या कामाप्रती फारच गंभीर असतात, त्यामुळे काही ना काही कामात ते सतत स्वत: ला व्यग्र ठेवतात. आपल्या मुलीच्या जन्माअगोदर विराटने काही दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुट्टी घेतली होती. त्यांच्या नात्यातील मजबुती कायम ठेवण्यासाठी, हे जोडपे आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यात चांगल्याप्रकारे समतोल राखतात.

सध्या विराट कोहली हा भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात खेळण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे हे जोडपे आपले अनेक नवनवीन गोड फोटो चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत असतात. आजही त्यांचे एकमेकांबद्दल प्रेम तितकेच कायम आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-‘मिर्झापूर’ वेबसीरिजनंतर श्रिया पिळगावकर ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार पत्रकाराची भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.