श्वेता नंदाला वहिनी ऐश्वर्या रायच्या ‘या’ सवयीची आहे खूप चीड; मुलाखतीत स्वत: केला होता खुलासा


पूर्व विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही आज संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तिच्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली आहे. ऐश्वर्याने बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले आहे. अमिताभ यांच्या परिवारातील जवळपास सगळेच चित्रपटसृष्टीत काम करतात. पण त्यांची मुलगी श्वेता नंदा ही बॉलिवूडपासून दूर आहे. तरीही ती खूप प्रसिद्ध आहे. तिची लोकप्रियता कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाहीये. अमिताभ बच्चन आणि त्यांची लाडकी श्वेता यांचे फोटो सोशल मीडियावर अनेकवेळा व्हायरल होत असतात. त्यांचे चाहते देखील या फोटोवर प्रेम दर्शवत असतात.

माध्यमातील वृत्तानुसार, श्वेता हिचे तिच्या वहिनीसोबत म्हणजेच ऐश्वर्या राय सोबत खूप चांगले नाते आहे. परंतु ऐश्वर्याची अशी एक सवय आहे, जी श्वेताला अजिबात आवडत नाही. या गोष्टीचा खुलासा करत श्वेताने एकदा तिच्या मुलाखतीत सांगितले होते. या मुलाखतीत श्वेताने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. यामध्येच तिने ऐश्वर्या रायबाबत देखील सांगितले होते. तिने सांगितले होते की, तिला ऐश्वर्याची एक सवय अजिबात आवडत नाही. याबाबत ती म्हणाली की, “ऐश्वर्या फोन आणि मेसेजचे उत्तर देत नाही जे मला अजिबात आवडत नाही.”

श्वेताने पुढे सांगितले की, “ऐश्वर्या एक खूप चांगली आई आणि एक स्ट्राँग महिला आहे. ही गोष्ट मला खूप आवडते.” श्वेताने १९९७ साली निखिल नंदा सोबत लग्न केले आहे. त्यांना दोन मुलं आहेत. मुलीचे नाव नव्या तर मुलाचे नाव अगस्त्य आहे. नव्या देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अनेक गोष्टींवर ती तिचे मत मांडताना दिसत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.