‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटातील सुंदर मंदाकिनीचा लेटेस्ट फोटो झाला व्हायरल; अनेक वर्षांनंतर अभिनेत्री आता दिसतेय ‘अशी’


‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनी तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. ज्यांनी त्यांच्या ग्लॅमरने आणि अदांनी लाखो मनांवर अधिराज्य गाजवले होते. मंदाकिनी त्यांच्या बोल्डनेसमुळे खूप लाइमलाईटमध्ये असायच्या. परंतु त्यांचे नाव कधीच यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सामील होऊ शकले नाही. त्यानंतर त्यांनी काही चित्रपटात काम केल्यानंतर चित्रपटसृष्टी सोडून दिली. पण आजही त्यांचे चाहते त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

जर तुम्ही मंदाकिनी यांचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी मंदाकिनीचा एका लेटेस्ट फोटो समोर आला आहे. मंदाकिनी या फोटोत खूप बदललेल्या दिसत आहेत. अभिनेत्रीचा हा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्यांनी निळ्या रंगाचा कुर्ता, पांढरी ओढणी घेतली आहे. तसेच त्यांनी डोळ्यांवर गॉगल घातला आहे. त्यांचे चाहते या फोटोवर भरभरून प्रेम दर्शवत आहेत. चाहते त्यांच्या या लेटेस्ट फोटोवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोमध्ये त्या स्टनिंग आणि सुंदर दिसत आहेत.

मंदाकिनीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, एके काळी त्यांचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत जोडले गेले होते. त्यांनी माजी बुद्धीस्ट मोंक डॉक्टर कागयुर टी रींपोचे ठाकूर यांच्यासोबत लग्न केले आहे. आता अशी माहिती आली आहे की, मंदाकिनी दलाई लामा यांच्या फॉलोवर झाल्या आहेत. त्या तिबेटमध्ये योगा क्लासेस देखील घेतात.

मंदाकिनीने ‘राम तेरी गंगा मैली’, ‘डान्स डान्स’, ‘लोहा’, ‘जाल’, ‘तेजाब’, ‘प्यार के नाम’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.