Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! ‘द काश्मीर फाईल्स’ फेम अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात, गंभीररित्या जखमी

धक्कादायक! ‘द काश्मीर फाईल्स’ फेम अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात, गंभीररित्या जखमी

सण 2022 मध्ये ‘द कश्मीर फाइल्स‘ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी सध्या त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर‘ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. त्याचवेळी सेटवरून पल्लवी जोशीच्या अपघाताची बातमी आली आहे.

हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री पल्लवी जाेशी (pallavi joshi) जखमी झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, एका वाहनाचे नियंत्रण सुटले आणि त्यानं अभिनेत्रीला धडक दिली, त्यानंतर अभिनेत्री जखमी झाली. काही दिवसांपूर्वीच ‘द व्हॅक्सिन वॉर’चे शूटिंग सुरू झाले होते, ज्याची माहिती विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियाद्वारे दिली. अशातच आता चित्रपटाच्या सेटवरून पल्लवी जोशीच्या अपघाताची माहिती येताच सर्वांनाच धक्क बसला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, पल्लवी जोशीला कारने धडक दिल्यानं त्या जखमी झाल्या, तरीदेखील त्यांनी आपला शाॅट पुर्ण केला आणि त्यानंतर त्या रुग्नालयात उपचारासाठी गेल्या. सध्या त्यांचा एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून अभिनेत्रीची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले आहे.

अभिनेत्री पल्लवी जोशी त्यांच्या मागील ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातून बऱ्याच चर्चेत आल्या हाेत्या. या चित्रपटात त्यांनी महाविद्यालयीन प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे मार्च 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला टीकेसोबतच लोकांकडून भरभरून प्रेमही मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340 कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट 2022 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. त्याचवेळी, नुकतेच या चित्रपटाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्रीशिवाय अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार हे देखील दिसले होते. ‘द कश्मीर फाइल्स’च्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात नुकतीच ‘कंतारा’ अभिनेत्री सप्तमी गौडाची एन्ट्री झाली आहे.bollywood actress pallavi joshi injured on the vaccine war set car hit actress)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट

चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

हे देखील वाचा