Monday, July 1, 2024

बाबा सिद्दिकीच्या पार्टीत ‘या’ कारणामुळे पूजा हेगडे झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘पहिल्यांदाच इफ्तार…’

बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनी रविवारी (दि. 16 एप्रिल)ला मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्याच्या ग्रॅंड इफ्तार पार्टीत चित्रपट आणि टीव्ही जगतातील अनेक लोकप्रिय स्टार्स पोहोचले होते. यादरम्यान सलमान खानपासून ते पूजा हेगडे, रश्मी देसाई, भारती सिंग, प्रीती झिंटा, जास्मिन भसीन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर पोज दिली. मात्र, ‘किसी का भाई किसी की जान‘ अभिनेत्री पूजा हेगडे माेठ्या प्रमाणात ट्राेल झाली. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

बाबा सिद्दीकी (baba siddiqui) यांच्या इफ्तार पार्टीत पूजा हेगडे (pooja hegde) काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पोहोचली हाेती. यावेळी अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने लहान प्लंगिंग नेकलाइनसह बॅकलेस ब्लाउज घातला होता, ज्यामुळे अभिनेत्री इफ्तार पार्टीत पाेहताच तिने सर्वांचे लक्ष वेधले. तिने होस्ट बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी यांच्यासोबत रेड कार्पेटवर जबरदस्त फोटोही क्लिक केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पूजा हेगडे पार्टीमध्ये खूपच सुंदर दिसत होती, परंतु इफ्तार पार्टीसाठी अभिनेत्रीने रिवीलिंग ड्रेस परिधान केल्यामुळे तिला ट्रोलचा सामना करावा लागला. अनेकांनी पूजाला फटकारले की, ती आमंत्रण पत्रिका वाचायला विसरली आहे किंवा ती पहिल्यांदाच इफ्तार पार्टीला येत आहे असे सांगून तिला ट्रोल केले. मात्र, मंडळी दक्षिण भारतीय अभिनेत्री सहसा त्यांच्या अप्रतिम ड्रेसिंग सेन्सने मन जिंकतात, परंतु यावेळी पूजा हेगडे नेटिझन्सद्वारे ट्रोल झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

पूजा हेगडेच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, अभिनेत्री सलमान खानसोबत ‘किसी की भाई किसी की जान’मध्ये मुख्य  भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 जुलैला थिएटरमध्ये प्रदर्शित हाेईल. अशात सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(bollywood actress pooja hegde trolled for wearing a revealing dress at baba siddiqui iftar part)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महिमा चौधरीला तिच्या कॅन्सरमधून बरे होण्यासाठी ‘हा’ शो ठरला महत्वाचा, अभिनेत्रीने मानले आभार

आर माधवनचा लेक वेदांतने पुन्हा एकदा देशासाठी जिंकली 5 सुवर्णपदके; अभिनेता म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे…”

हे देखील वाचा