Friday, December 8, 2023

शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त राज कुंद्राने पोस्ट केला दीपिकाचा फोटो; म्हणाला, ‘आमच्यामध्ये कोणीही येऊ …’

शिल्पा शेट्टी बॉलिवूडमध्ये तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अशात अभिनेत्री गुरुवारी (8 जुन)ला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी शिल्पाला शुभेच्छा देण्यासाठी राज कुंद्राने सोशल मीडियावर एक मॉन्टेज व्हिडिओ शेअर केला आहे, परंतु या क्लिपमध्ये त्याने दीपिका पदुकोणचा फोटो देखील टाकला आणि तिचा विशेष उल्लेख केला आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

शिल्पा शेट्टी ( shilpa shetty) हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज कुंद्रा (raj kundra) याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पाचा मुलगा विवान आणि मुलगी मीशाही दिसत आहे. यासोबतच त्याने दीपिका पदुकोणचा फोटोही टाकला आहे. या फाेटाेत दीपिका पदुकोण शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या मध्यभागी उभी असलेली दिसत आहे. तिघेही एका पार्टीत मस्ती करताना दिसत आहेत. राज कुंद्राने गंमतीने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. दीपूही नाही.’

राज कुंद्राने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या जोडीदारा, अलीकडे आपल्याला खरोखरच काही चढ-उतार आले आहेत. अशात तुमचा माझ्यावरील विश्वासाबद्दल धन्यवाद. तू माझा जिब्राल्टरचा खडक आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आणखी चांगल्या आठवणी बनवण्यास विश करताे माझी एंजेल शिल्पा शेट्टी वाढदिवसाच्या शुभेच्छा यम्मी मम्मी..माय कुकी.”

व्हिडिओमध्ये राज कुंद्राने शिल्पा शेट्टीसोबत घालवलेले अनेक रोमँटिक क्षण शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये राज आणि शिल्पा चेहऱ्यावर मास्क लावून पोज देताना देखील दिसत आहेत.(bollywood actress shilpa shetty birthday husband raj kundra share montage video with special mention of deepika padukone )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
लग्नाच्या तीन वर्षानंतर चारु अन् राजीव सेनचा घटस्फाेट; लेक जीयानाची कस्टडी मिळाली ‘या’ व्यक्तीला

हे देखील वाचा