Friday, March 29, 2024

गुडन्यूज! सोनमच्या घरी नवा पाहूणा; अभिनेते अनिल कपूर बनले आजोबा

शनिवार (20 ऑगस्ट) मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला आहे. अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. नीतू कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ती अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या वतीने आहे. शेअर केलेल्या पोस्टनुसार, अभिनेत्रीने शनिवारी, 20 ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला.

नीतू कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की “20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या मुलाचे स्वागत केले आहे. या सुंदर प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आपल्याला माहित आहे की आता आपले जीवन कायमचे पूर्णपणे बदलणार आहे.” दरम्यान या बातमीनंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी सोनम कपूरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा –

जरा इकडं पाहा! प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय, ‘सेक्ससाठी पुरुषांची गरज नाही’, सर्वत्र रंगलीय चर्चा

पवनसिंग -आम्रपाली दुबेचे धमाल गाणे सोशल मीडियावर व्हायरल, ५५ कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ

बिपाशा बासू पाठोपाठ आता ‘ही’ अभिनेत्री देणार गूड न्यूज, व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

हे देखील वाचा