Thursday, June 13, 2024

तब्बल 29 वर्षांनंतर काजोलने मोडला नो किसिंग रूल; ‘या’ अभिनेत्यांसोबत लिपलाॅक करतानाचा व्हिडिओ व्हायरल

बाॅलिवूड अभिनेत्री काजोलने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचे लाखो चाहते आहेत. तिने सिनेसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काजोल सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. सध्या काजोल ‘द ट्रायल’ या वेब ​​सीरीजमुळे चर्चेत आली आहे.

काजोलने जवळपास 31 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यादाच किसिंग सीन दिला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये काजोल चर्चेचा विषय ठरत आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ओटीटीवरील तिच्या पहिल्या वेब सीरिजमध्ये काजोलने तिच्या सहकलाकारांना किस करताना पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले. आता या मालिकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काजोल किस करताना दिसत आहे.

शोसाठी 48 वर्षीय काजोलने तिची नो किसिंग रूल (Kajol Kiss Scene) मोडल्याची चर्चा सर्वत्र आहे. या वेब सीरिजमध्ये ती वकिलाची भूमिका साकारताना दिसत आहे. काजोलने शोच्या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये दोन अभिनेत्यांसोबत किसिंग सिन दिले आहे. तिने अभिनेते अली खान आणि जिशू सेनगुप्ता यांचे चुंबन घेतले आहे. ‘द ट्रायल’मधील काजोलचे उत्कट लिप-लॉक आणि इंटिमेट सीन्स सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

 काजोलच्या 29 वर्षांच्या कारकिर्दीत ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा काजोलने ऑनस्क्रीन किस देऊन तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. हा सीन व्हायरल झाल्यानंतर काही जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काही निराश झाले आहेत. एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, ‘मालिकेत काजोलने एकदा नव्हे तर दोनदा चुंबन घेतले यावर माझा विश्वास बसत नाही.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘मला काजोलकडून अशी अपेक्षा नव्हती.’ यामध्ये काजोल पारंपारिक भारतीय स्त्रीसारखी दिसत आहे. सिनेमाच्या बदललेल्या दुनियेत काजोल स्वत:ला बदलताना दिसत आहे. (bollywood Actresses kajol kiss viral video web series the trial first time on screen)

अधिक वाचा- 
वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान; पाहा फोटो
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; दोन आठवड्यात जमवला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

हे देखील वाचा