Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्झरी हॉटेल्स आणि आलिशान बंगल्याचे मालक आहेत ‘मिथुन चक्रवर्ती!’ घराला असतो 76 कुत्र्यांचा पहारा

बॉलिवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांनी आतापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये काम केले आहे. मग ते क्षेत्र कोणतेही असो. प्रत्येक क्षेत्रात ते आपले नशीब आजमावत असतात. यातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे राजकारण. आजकाल पाहिलं तर बॉलिवूडमधील मंडळी ही मुख्यतः राजकारणावरच जास्त भर देत आहेत. अनेकांनी राजकारणात आपले पाय रोवले आहेत. यात उर्मिला मातोंडकर, सुनील दत्त, हेमा मालिनी, विनोद खन्ना, धर्मेंद्र अशा अनेकांचा समावेश आहे. अशात गेल्या वर्षी राजकारणात प्रवेश करणारे मिथुन चक्रवर्ती आज शुक्रवारी (16 जुन)ला त्यांचा 72वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणू घेऊया अभिनेत्याच्या आयुष्यातील काही रंजक किस्से…

राजकारणामध्ये प्रवेश करण्याअगोदर मिथुन चक्रवती (mithun chakraborty)हे बॉलिवूडमधील नावाजलेले अभिनेते आहेत. ‘डिस्को डान्सर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याचे खासगी आयुष्य फार सुंदर आहे. अनेक चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी यशस्वी भूमिका साकारली होती. आज ते एक लोकप्रिय अभिनेते म्हणून नावारूपास आले आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, एकेकाळी ते नक्षलवादी होते. पण एका दुर्घटनेमध्ये त्यांच्या भावाचा मृत्यू झाला आणि ते पुन्हा आपल्या कुटुंबात दाखल झाले. सुरुवातीपासूनच त्यांना डान्सची प्रचंड आवड होती. त्याचदरम्यान त्यांनी अनेक स्टेज शो केले . डान्सप्रमाणे त्यांना अभिनय करण्याची देखील इच्छा होती. त्यामुळे बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी त्यांनी अभिनेत्री हेलन सोबत असिस्टंट पदावर काम केले होते.

त्यांच्या अभिनयाला पहिला ब्रेक मिळाला तो ‘मृगया’या चित्रपटामुळे. या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनयाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना अनेकदा अपयश आले होते. त्यांचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाधड आपटत होते. त्यानंतर मिथुन यांना काही काळ स्ट्रगल करावा लागला. ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे त्यांचे नशीब पालटले. अनेक चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे मिथुन हे सध्या मोठा पडद्यापासून खूप लांब आहेत. आता राजकारणातील भाजप प्रवेशामुळे ते पून्हा एकदा लाईमलाईटमध्ये आले आहेत.

अभिनेत्याप्रमाणे मिथुन चक्रवर्ती एक व्यावसायिक देखील आहेत. त्यांचे उटीमध्ये मोठे लक्झरी हॉटेल आहे ज्यामधून ते करोडो कमावतात. सोबतच मुंबईमधील बांद्रा आणि मढ आयलंडमधे बंगले आहेत. मिथुन चक्रवती हे जनावरांवर खूप प्रेम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या बंगल्यामध्ये 76 पाळीव कुत्रे आहेत. ज्यांना एका मोठ्या वातानुकूलित रूममध्ये ठेवले जाते. हे कुत्रे त्यांच्या घराचे रक्षण करतात.

मिथुन ग्रुप ऑफ हॉटेल्स मोणार्कच्या ऑफिशिअल वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार त्यांच्या उटीमधील हॉटेलमध्ये 59 रूम्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोअर स्विमिंग पूल, डिस्क थिएटर, मिड नाईट काऊ बॉय बार सोबतच किड्स कॉर्नरसारख्या सुविधांचा समावेश आहे.

शेकडोहून अधिक चित्रपटात काम केलेले मिथुन चक्रवती आजही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच आजही ते वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. झी टीव्हीवरील प्रसिद्ध डान्स रियॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी परीक्षकाची भूमिका साकारली होती. सोबतच त्यांनी ‘वारदात’, ‘अविनाश’, ‘जाल’, ‘कसम पैदा करने वाले की’, ‘भ्रष्टाचार’, ‘वतन के रखवाले’, ‘हमसे है जमाना’, ‘बाजी’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

काही दिवसांपूर्वीच विनोद अग्निहोत्री दिग्दर्शित मसूरी मध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मिथुन चक्रवती सेटवरच कोसळले होते. फूड पॉइझनिंगमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. (bollywood famous actor mithun chakroborty property and luxury lifestyle which u never know)

अधिक वाचा-
डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल
मराठमोळ्या उर्मिलाच्या हाॅटनेसचा कहर; पहा फोटो

हे देखील वाचा