Tuesday, March 19, 2024

प्रियामणि आहे ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची चुलत बहीण, तिच्या बिकिनी सीनमुळे रंगली होती एकच चर्चा!

शुक्रवारी (४ जून) मनोज बाजपेयीची ‘द फॅमिली मॅन २’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. या वेबसीरिजचा पहिला भाग तुफान गाजला, पहिला भाग आल्यापासूनच या सीरिजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता होती, अखेर हा भाग देखील प्रदर्शित झाला. पहिला भाग आल्यानंतर या सीरिजमधील कलाकारांना सुद्धा खूप लोकप्रियता मिळाली. या भागातील मनोज बाजपेयी सोबतच चर्चेत आलेला एक मोठा चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रियामणि. प्रियामणिने या सीरिजमध्ये मनोज वाजपेयींच्या बायकोची सुचित्राची भूमिका निभावली होती. शुक्रवारी याच प्रियामणिने आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल काही गोष्टी…

प्रियामणिचा जन्म ४ जून, १९८४ रोजी कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये एका तमिळ ब्राह्मण परिवारात झाला. तिचे पूर्ण नाव प्रिया वासुदेव मणी अय्यर आहे. प्रियामणि यांच्या वडिलांचा प्लांटेशनचा व्यवसाय असून, तिची आई लता ह्या राष्ट्रीय पातळीवरील माजी बॅडमिंटन खेळाडू आहे. प्रियाला कोणतीही सिनेमांची पार्श्वभूमी नसतांनाही केवळ प्रतिभेच्या नावावर तिने या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज प्रियामणि साऊथच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने प्रिंट जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. प्रियामणि आणि विद्या बालनमध्ये यांच्यामध्ये एक नाते देखील आहे. खूप कमी लोकांना माहित असेल की, प्रियामणि आणि विद्या बालन या चुलत बहिणी आहेत. चित्रपटांची सुरुवात फ्लॉप सिनेमाने करून देखील प्रियामणिने मेहनतीने यश मिळवलेच. प्रियामणिने तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘परुथिवीरण’ या सिनेमासाठी प्रियामणिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सन २००९ मध्ये आलेल्या ‘द्रोणा’ सिनेमात प्रियामणिचा अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. यात तिच्या बिकिनी सीनमुळे सगळीकडे फक्त आणि फक्त प्रियामणिचीच चर्चा होती. या सीनसाठी प्रियामणिला जास्त पैसे दिल्या गेल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.

प्रियामणिने मणी रत्नम यांच्या ‘रावण’ सिनेमातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. यात तिने अभिषेक बच्चनच्या बहिणीची भूमिका निभावली होती. मात्र, हा सिनेमा फ्लॉप झाला. पुढे तिने ‘अतीत’, ‘रक्तचरित्र २’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये काम केले आहे. चेन्नई एक्सप्रेसमध्ये तिने ‘१,२,३,४ गेट ऑन द डान्स फ्लोर’ गाण्यात तिच्या नृत्याची कलादेखील सादर केली.

प्रियामणिला हिंदीमध्ये खरी ओळख आणि लोकप्रियता ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या पहिल्या भागातून मिळाली. या सीरिजमध्ये प्रियामणिने एका स्ट्रॉंग, शिस्तप्रिय अशा दोन मुलांच्या आईची भूमिका निभावली आहे. जी नोकरी करूनही घराला उत्तम पद्धतीने सांभाळते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा