बॉलिवूड सोबत हॉलिवूड मध्येपण आपल्या कामगिरीचा जलवा दाखवणारे अभिनेते कबीर बेदी आपल्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत.त्यांनी आता त्यांचे ‘स्टोरीज आय मस्ट टेलः द इमोशनल लाइफ ऑफ अॅक्टर’ हे चरित्र जाहीर केले आहे. या आत्मचरित्रात कबीर बेदी यांनी त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस आणली आहेत. ज्यामध्ये परवीन बाबी, त्यांच्या जवळच्या नात्यापासून ते यांची पहिली पत्नी प्रतिमा यांच्याशी लग्न करण्यापर्यंतच्या, सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. आता कबीर बेदी यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
कबीर बेदी यांनी सांगितले की, त्यांनी एकदा आपली पत्नी परवीन दुसांझ यांना आपले नाव बदलण्यास सांगितले. कारण त्यांच्या आयुष्यात आधीपासूनच एक परवीन होत्या, त्यांच्याबरोबर ते नात्यात राहीले होते, ज्यांचे आयुष्य मानसिक आजारांनी वेढलेले होते. अशा परिस्थितीत कबीर यांना भिती वाटायची की, लोकांनी आपली पत्नी परवीन दुसांझला परवीन बाबी समजू नये.
पण पती कबीर बेदी यांचे हे विचार ऐकून, त्यांची पत्नी परवीन या संतापल्या. हे ऐकून त्या रागावल्या, आणि कबीर बेदी यांना विचारले की माझे नाव बदलण्यास सांगायची हिम्मत कशी झाली तुमची? ”तसेच पत्नी परवीन यांनी आपले नाव बदलण्यास स्पष्टपणे नकार दिला. पण, जेव्हा परवीन दुसांझ भारतात आल्या, तेव्हा त्यांना समजले की, परवीन हे नाव ‘कबीर बेदीच्या आयुष्यातील एक विसरलेला भाग आहे’. यानंतर कबीर बेदी यांनी आपल्या पत्नीला ‘व्ही’ नावाने हाक मारण्यास सुरवात केली.
अभिनेते कबीर बेदी यांनी भारतीय चित्रपटात बर्याच चित्रपटांमध्ये काम करून, आपली दमदार कामगिरी सिद्ध केली आहे. कबीर बेदी आपल्या चित्रपटांपेक्षा अभिनेत्रींशी असलेल्या संबंधांबद्दल चर्चेत होते. कबीर बेदी यांनी आयुष्यात चार विवाह केला होते. त्यांची चौथी पत्नी परवीन दुजांज या कबीर यांच्यापेक्षा २९ वर्षांनी लहान आहे.


