Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड करण जोहर नव्या प्रेमकथेसह परतला रुपेरी पडद्यावर, आलिया-रणवीरच्या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज

करण जोहर नव्या प्रेमकथेसह परतला रुपेरी पडद्यावर, आलिया-रणवीरच्या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘चा ट्रेलर मंगळवारी (4 जुलै)ला रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. या चित्रपटाद्वारे करण 7 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. आलिया आणि रणवीरशिवाय या चित्रपटात शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत.

करण जोहर (karan johar) पुन्हा एकदा एका नव्या प्रेमकथेसह मोठ्या पडद्यावर परतला आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा बॉलिवूड स्टाइलचा रोमान्स पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

सोमवारी (3 जुलै)ला, इंस्टाग्रामवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना, आलिया, रणवीर आणि करण यांनी सांगितले की, मंगळवारी (4 जुलै)ला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ही घोषणा झाल्यापासून चाहते या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत हाेते. अनेक दिवसांपासून हा रोमँटिक ड्रामा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक हाेते. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

काही दिवसांपुर्वी या चित्रपटातील ‘तुम क्या मिले’ हे गाणे रिलीज झाले होते, जे अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. हे गाणे सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याबद्दलचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती या गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे. आलियाने मुलगी राहा हिला जन्म दिल्यानंतर हे गाणे शूट केले आहे. (bollywood movie rocky aur rani ki prem kahani trailer alia bhatt ranveer singh karan johar )

अधिक वाचा-
माेठी बातमी! शूटिंगदरम्यान शाहरुख खानचा अपघात; अभिनेता गंभिररित्या जखमी
किशाेरवयात तेजस्वीचा झाला हाेता विनयभंग; खुलासा करत म्हणाली,’मी रस्त्यावर एकटी हाेती अन् दोन मुलं…’

हे देखील वाचा