Thursday, April 18, 2024

राखीने वधूसारखे आऊटफिट परिधान करून ढोल-ताशांवर लावले जोरदार ठुमके; म्हणाली, ‘ही माझी ब्रेकअप…’

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीनराखी सावंत कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच राखीने पती आदिल दुर्रानीवर अनेक गंभीर आरोप केले होते आणि ती आदिलपासून घटस्फोट घेत असल्याचे स्पष्ट केले होते. अशातच आता राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी ढोलावर नाचताना सांगत आहे की, तिचा आदिलसोबतचा घटस्फोट फायनल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंत (akhi sawant) वधूसारखे आऊटफिट परिधान करून ढोल-ताशांवर जोरदार नाचताना दिसत आहे. अशात राखीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे. या व्हिडिओमध्ये राखी म्हणते की, “होय, मी शेवटी घटस्फोट घेत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी हाेतात, पण मी आनंदी आहे… चला सुरुवात करूया.” एवढं बोलून राखी तिच्या डोक्यावर ओढणी ओढून ढोलाच्या तालावर जोरदार नाचू लागते. राखीचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

घटस्फोटाचा आनंद साजरा केल्यानंतर राखी पुन्हा तिच्या अपार्टमेंटमध्ये गेली. यादरम्यान, जेव्हा ती लिफ्ट येण्याची वाट पाहत होती, तेव्हा सोसायटीतील एक सदस्य संतापला आणि त्यांनी सिक्युरिटीला विचारले की, तुम्ही इतक्या मीडियावाल्यांना आत कसे जाऊ दिले. ती व्यक्ती म्हणाली, “हा काय मूर्खपणा आहे, मीडियाचे इतके लोक इथे का आहेत? सेक्युरीटी, तुम्ही त्यांना परवानगी कशी दिली? कृपया त्यांना येथून दूर पाठवा.”

त्यानंतर प्रसारमाध्यमांना जाण्यास सांगितले असता, झालेल्या हाणामारीत अनेक जण जखमीही झाले. दुसरीकडे, माध्यमातील वृत्तानुसार, राखी सावंतने नंतर सांगितले की, तिच्या इमारतीतील लोक तिला अनेकदा त्रास देतात. ती फक्त आदिलशी घटस्फोट झाला तेव्हाच ढोल-ताशांवर नाचत हाेती. (tv actress rakhi sawant celebrated her divorce from adil durrani danced on drum wearing a red outfit)

अधिक वाचा-
घटस्फोटानंतर चारू असोपा अन् राजीव सेन पुन्हा येणार एकत्र? अभिनेत्याने केला माेठा खुलासा
‘जी कर्दा’मध्ये इंटिमेट सीन दिल्याबद्दल अभिनेत्रीचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘लोकांना आवडो वा न आवडो…’

हे देखील वाचा