बॉलिवूडने ‘या’ विषयांवर बनवावे सिनेमे, कमाईत हॉलिवूडलाही मागे टाकेल हिंदी चित्रपटसृष्टी

0
86
Disaster-Movies
Photo Courtesy : ScreenGrab/YouTube/WatchMojo.com

बॉलिवूड म्हटलं की, डोळ्यापुढे येतात तेच ते रोमँटिक सिनेमे, ऍक्शन सिनेमे आणि कॉमेडी सिनेमे. एकदा का रोमँटिक सिनेमांची गाडी सुरू झाली की, पुढील काही वर्षे तेच विषय प्रेक्षकांपुढे मांडले जातात. यात जरा साऊथ इंडस्ट्री पुढंच म्हणावी लागेल. कारण त्यांच्या प्रत्येक सिनेमात काहीतरी विषय नवीन असतोच. त्यांची स्टोरी म्हणा, मांडणी म्हणा, कलाकारांची निवड म्हणा याबाबतीत साऊथ इंडस्ट्री जरा पुढेच. असं काहीसं बॉलिवूडमध्ये फार कमीच पाहायला मिळतं, पण बॉलिवूड काय रोमँटिक सिनेमे बनवणे सोडायला तयारच नाहीये. या अशा विषयांवर सिनेमे बनवण्यापेक्षा त्यांनी जर चौकटीबाहेरच्या विषयांवर सिनेमे बनवले, तर नक्कीच बॉलिवूड वेगळ्या लेव्हलला जाईल यात शंकाच नाही. कोणते आहेत ते विषय, ज्यावर बॉलिवूडने सिनेमे बनवले पाहिजेत, चला जाणून घेऊया…

सर्वनाश
एखादा व्हिलन संपूर्ण जग संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाताना आपल्याला सिनेमात दिसतं. मग ते एखादा व्हायरस पसरवणे असो किंवा मिसाईल दागने. हे सर्व हॉलिवूडवालेच दाखवतात. पण हे सर्व हॉलिवूडनेच दाखवणं गरजेचं नाहीये. बॉलिवूड दरवर्षी जवळपास हजारो सिनेमे तयार करते. पण यांसारख्या विषयावर हजारोतील एखादाही सिनेमा बनवला जात नाही. जर अशा विषयावर बॉलिवूडने सिनेमे बनवले, तर प्रेक्षकांसाठी ही नक्कीच पर्वणी ठरेल.

आपत्ती चित्रपट
आपण अनेकदा हॉलिवूड सिनेमात पाहतो की, वादळ येणं, त्सुनामी येणं, जगाचा सर्वनाश होणं या सर्व गोष्टींचा सामना फक्त हॉलिवूड इंडस्ट्रीच करताना दिसते. हो ना. कारण यांसारख्या विषयांवर नेहमी हॉलिवूडच सिनेमे तयार करते. बॉलिवूडमध्ये असे सिनेमे नाहीतच, पण जर अशा विषयांवर भर दिला, तर एक नवीन प्रेक्षकवर्ग तयार होईल.

आयडेन्टिटी क्रायसिस
फाईट क्लब, सिक्स्थ सेन्स, द मशीनिस्ट किंवा अगदी प्रसिद्ध टॅक्सी ड्रायव्हर यांसारखे सिनेमे घ्या. या सर्व सिनेमांतील त्यांच्या नायकांनी स्वत:च्या ओळखीसाठी खूप कष्ट घेतले. आणि त्यांचा प्रवास प्रेक्षकांना आवडला देखील, पण यांसारखे तगडे सिनेमे आम्ही बॉलिवूडमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही हा प्रयत्नही लवकरच सोडून दिला. असे सिनेमे बॉलिवूडमध्ये नाहीयेतच. आता नेहमीचे सिनेमे पाहून भारतीय प्रेक्षकवर्ग कंटाळला आहे. आता त्यांना बदल हवा आहे.

टाईम ट्रॅव्हेल
हॉलिवूडसाठी टाईम ट्रॅव्हेल हा विषय तसा जुनाच. तसा तो तिकडच्या प्रेक्षकांचा आवडीचा विषय. सिनेमाचं उदाहरण घ्यायचं झालं, तर १९८५ साली रिलीझ झालेला सिनेमा म्हणजे ‘बॅक टू द फ्युचर.’ यानंतर त्याचे दोन सिक्वेल १९८९ आणि १९९० मध्ये रिलीझ झाले. ही सीरिज हॉलिवूड सोडली, तर बॉलिवूड प्रेक्षकांच्याही आवडीचीच आहे. बॉलिवूडमध्ये असे मोजकेच सिनेमे आहेत. जसे की, ‘ऍक्शन रिप्ले’ आणि ‘लव्ह स्टोरी २०५०.’ मात्र, हेही फार काही कमाल दाखवू शकले नाहीत, पण जर बॉलिवूडने हॉलिवूडकडून काही प्रेरणा घेऊन असे आणखी सिनेमे बनवले, तर त्याकडे प्रेक्षक आकर्षित होतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

विसाव्या वर्षी साकारला ८० वर्षांचा म्हातारा, दिलीप साहेबांवरील प्रेमाखातर मनोज यांनी बदलले स्वत:चे नाव

एवढ्या मोठ्या सुपरस्टारने ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचवेळी का घातली १९९ रुपयांची चप्पल?, जाणून घ्या कारण

अनिल कपूरची मस्ती त्यालाच भोवली; एका चापटीने भागलं नाही, म्हणून जग्गू दादाकडून १७ वेळा खाल्ली कानाखाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here