Video: ‘बिग बीं’नी घेतली बारामतीची भेट, पण बारामतीकरांनी चुकवली संधी!

Bollywood Superstar Amitabh Bachchan And Ajay Devgan Visit Baramati To Shooting


आज सकाळी अकराच्या सुमारास हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन बारामतीमध्ये आले होते. ‘बिग बी’ यांच्यासोबत अजय देवगणनेही बारामतीला भेट दिली. हे दोघे बारामती विमानतळावर उतरल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण काही मोजकी लोकं सोडली तर याबाबत कोणालाही माहिती नव्हते.

अमिताभ बच्चन आणि अजय देवगण बारामतीमध्ये येण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी त्यांच्या आगामी ‘मायडे’ चित्रपटाचे शूट होणार होते. यासाठी हे दोघे कलाकार आज सकाळी खासगी हेलिकॉप्टरने बारामती विमानतळावर उतरले.

यादरम्यानचे इंस्टाग्रामवरील एका युझरने शेअर केेले आहेत.

अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांचे स्वागत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार, शुभांगी पवार इत्यादी मंडळी उपस्थित होती.

सुनेत्रा पवार यांच्यासोबतचे अभिनेत्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बारामतीकरांना याबाबत माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी विमानतळाकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत दोन्ही कलाकार शूटिंग संपवून मुंबईकडे रवाना झाले होते.

तसेच दुपारी दोन वाजेपर्यंत हे दोन तारे बारामतीतच होते. इतका वेळ असूनही त्यांना भेटता आले नाही, ही खंत बारामतीकरांच्या मनात कायमची राहील.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.