Wednesday, June 3, 2026
Home बॉलीवूड कंगना रणौतला फटका; जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कोर्टाने फेटाळली अभिनेत्रीची याचिका

कंगना रणौतला फटका; जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कोर्टाने फेटाळली अभिनेत्रीची याचिका

ज्येष्ठ कवी जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या मानहानी प्रकरणाची सुनावणी आता १४ सप्टेंबरला होणार आहे. कंगनाने जावेद यांच्याकडून करण्यात आलेली मानहानीची तक्रार रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु ती न्यायालयाने फेटाळली. यापूर्वी कंगनाने या प्रकरणी न्यायालयात हजर राहणे टाळले होते. बुधवारी (१ सप्टेंबर) पुढील सुनावणी होणार होती. त्यामुळे बुधवारी कंगनाला न्यायालयात उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. कंगनाने व्यावसायिक कारणास्तव कायमस्वरूपी न्यायालयात हजर राहण्यास सूट देण्याची विनंती केली होती, जी न्यायालयाने फेटाळली.

न्यायालयाने म्हटले होते की, ‘आरोपीच्या वकिलांनी दाखल केलेला सवलत अर्ज आज शेवटचा स्वीकारला जात आहे. आरोपीच्या वकिलाला सूचना दिली जात आहे की, पुढील सुनावणीच्या तारखेला आरोपीला कोर्टात हजर करावे लागेल.’

या अगोदरच्या सुनावणीत अंधेरीच्या मेट्रोपोलिटन मैजिस्ट्रेट आरआर खान यांनीही अख्तर यांचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यांनी कंगनाला अटक करण्याचे निर्देश मागितले होते. त्याचवेळी कोर्टाने म्हटले होते की, ‘कंगना सुनावणीच्या पुढील तारखेला हजर नसेल, तर तक्रारदार पुन्हा अर्ज दाखल करू शकतो.’

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने जावेद अख्तर यांच्या विरोधात काही गोष्टी सांगितल्या होत्या. यानंतर जावेद अख्तर यांनी अंधेरी न्यायालयात तिच्याविरुद्ध फौजदारी बदनामीची तक्रार दाखल केली होती. जावेद अख्तर म्हणाले होते की, ‘कंगनाने त्या मुलाखतीत जे काही सांगितले आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे.’

कंगनाबद्दल थोडक्यात
अभिनेत्री कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने साल २००६ मध्ये अभिनयक्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. तिचा पहिला चित्रपट ‘गँगस्टर’ हा होता. तिचा शेवटचा चित्रपट ‘पंगा’ हा २०२० मध्ये आला होता. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर कंगना अनेकवेळा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

दोनदा लस घेऊनही फराह खान कोरोनाच्या तावडीत; शिल्पा अन् ‘बिग बीं’सोबतही केली होती शूटिंग

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा