अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी 2’ आणि अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिनेमा 11 ऑगस्ट म्हणजे एकाच दिवशी प्रदर्शित झाला. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांची बाॅक्स ऑफिसवर टक्कर झाली. हे दोन्ही सिनेमे दमदार असल्यामुळे बाॅक्स ऑफिसवर मोठा खेळी रंगली. या दरम्यान गदर 2ने बाजी मारली. पण आता शाहरूख खान स्टारर जवान चित्रपट नुकताच रिलिज झाला आहे. जवानच्या वादळात गदर 2 उडुन गेला आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ चित्रपटातून सनी देओल 22 वर्षांनंतर ‘तारा सिंग’च्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला आला. गदर: एक प्रेम कथाच्या तुलनेत ‘गदर 2’ ला चाहत्यांचे दुप्पट प्रेम मिळाले. ‘ओएमजी 2’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारख्या चित्रपटांना मागे टाकून ‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. मात्र, आता थिएटरमध्ये ‘जवान’ रिलीज झाल्यानंतर ‘गदर 2’चे कलेक्शन हळूहळू कमी होत आहे. आता ‘जवान‘ने (jawan movie) ‘गदर 2’च्या जगभरातील कमाईवरही डल्ला मारला आहे.
65 वर्षीय सनी देओल सध्या करिअरच्या शिखरावर आहे. धर्मेंद्र यांच्या लाडक्या मुलाच्या करिअरमध्ये ‘गदर 2’ हा सोन्याचा दगड ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांना पराभूत केले होते. मात्र, 32 दिवसांनंतर चित्रपटाचा वेग हळूहळू कमी होत आहे. जगभरातील ‘गदर 2’ ने 600 कोटींचा टप्पा ओलांडला आणि 700 कोटींची कमाई करण्याचे त्यांचे पुढील लक्ष्य होते. पण ‘जवान’ येताच हे स्वप्न धुळीस मिळाले.
‘गदर 2’ने जगभरात सुमारे 2 कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत ‘गदर 2’ ने जगभरात एकूण 672 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात एकूण 65.5 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील आकडे पाहता आता या चित्रपटाला 700 कोटींचा आकडा गाठणे फार कठीण वाटते. (box office movie gadar 2 worldwide box office collection Actor shahrukh khan movie jawan break Actor sunny deol dream to enter in 700 crore club onmonday)
अधिक वाचा-
–धर्मेंद्र यांच्या तब्येतीत बिघाड, सनी देओल वडिलांच्या उपचारासाठी पोहचला अमेरिकेत
–गौरव मोरेचे नशीब चमकले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका