Thursday, September 28, 2023

गौरव मोरेचे नशीब चमकले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा शो आता घराघरात पसरला आहे. या शोमधील अनेक कलाकार देखील अनेकांना आवडत आहे. त्यातीलच गौरव मोरे हा या शोमध्ये विविध भूमिका साकारताना दिसतो. मागील अनेक वर्षापासून तो महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्याचा अभिनय देखील सगळ्यांना खूप आवडतो.

मागील अनेक दिवसापासून गौरवला (Gaurav more) एका मागे मराठी आणि हिंदी सिनेमांची लॉटरी लागली आहे. अशातच यात आणखी एका मराठी सिनेमाची भर पडली आहे. गौरव आपल्याला लवकरच मराठी सिनेमा ‘परिनिर्वाण’ या चित्रपटात एक भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘परीनिर्वाण’ हा चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाची मागील काही दिवसांपूर्वी घोषणा झाली होती. या चित्रपटात गौरव शामराव ही भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे. गौरव सिनेमाची स्क्रिप्ट शेअर केली आणि स्क्रिप शेअर करून गौरव एक नवीन सुरुवात असे कॅप्शन दिलेले आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधारावर असलेला हा सिनेमा काहीतरी जादू करणार आहे असे दिसत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक भूमिका साकारताना दिसणार आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित हा चित्रपट येत असल्याची चर्चा होती. अखेर या चित्रपटाची घोषणा झाली आहे आणि या चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील रिलीज करण्यात आलेले आहे.

या पोस्टर वेळी प्रसाद ओक देखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे या चित्रपटात तो देखील असणार, याची सगळ्यांना खाजगी होती. परंतु तो कोणत्या पात्र साकारणार आहे. हे जाणून घेण्याची सगळ्यांना होती. अखेर प्रसाद ओक या चित्रपटात नामदेव व्हटकर ही भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
धर्मेंद्र यांच्या तब्येतीत बिघाड, सनी देओल वडिलांच्या उपचारासाठी पोहचला अमेरिकेत
सलग पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चाच डंका, केली एवढ्या कोटींची कमाई
‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

हे देखील वाचा