दोन बंटी आणि दोन बबली काय आहे नक्की भानगड?, बंटी और बबली २ चा टिझर प्रदर्शित

गेले दोन वर्ष संपूर्ण जग कोरोना महामारीसोबत लढत आहे. याचा फटका समाजातील प्रत्येक गोष्टीला बसला आहे. या सगळ्यात सिनेसृष्टीला खूप मोठा तोटा सहन करावा लागला आहे. गेले दोन वर्ष सगळे चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद होती. त्यामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. अशातच राज्यसरकारने चित्रपटगृहे चालू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या वर्षी अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

अशातच यशराज यांचा ‘बंटी और बबली २’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांची जोडी १२ वर्षानंतर पुन्हा एकदा चंदेरी पडद्यावर सोबत दिसणार आहे. त्यांना पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. (bunty aur babali 2 teaser release, movie will release on 19 th november)

‘बंटी और बबली २’ या चित्रपटाचा टिझर १.२६ सेकंदाचा आहे. या टीझरची सुरुवात सैफ अली खान आणि राणी मुखर्जीसोबत होती. यामध्ये राणी मुखर्जी सैफ अली खानला म्हणते की, “सैफू आपण किती वर्षांनी एकत्र काम करत आहोत ना.” यावर सैफ म्हणतो की, “आपण १२ वर्षांनी एकत्र काम करत आहोत.” राणी म्हणते की, सैफसोबत काम करण्याचा अनुभव तिने खूप मिस केला.

यानंतर तो राणीचे कौतुक करताना दिसत आहे. दोघे शूटिंगसाठी तयार होतात तेव्हा मागून सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी येऊन म्हणतात की, ते देखील शूटिंगसाठी तयार आहोत. यावर राणी म्हणते की, “तुम्ही कोण आहात.” तर यावर सिद्धांत आणि शर्वरी म्हणतात की, “ते बंटी आणि बबली आहेत.” यावर राणी म्हणते की, “एकच बबली आहे आणि ती…” यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण म्हणतात की, “आदित्य सरांनी स्क्रिप्ट बदलली आहे. आता चित्रपटात दोन बंटी आणि बबली असणार आहेत.” यानंतर राणी आणि सैफ दोघे त्यांच्या त्यांच्या मेकअप रूममध्ये निघून जातात. मग सिद्धार्थ आणि शर्वरी म्हणतात की, “आम्ही तर तयार आहोत यांचा टाइम गेला आणि पॅकअप होते.”

‘बंटी और बबली २’ हा चित्रपट १९ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टिझर खूपच मजेशीर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक वरून वी शर्मा आणि निर्माते आदित्य चोप्रा आहेत.

सैफ अली खान आणि राणी मुखर्जीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. २००५ साली ‘बंटी और बबली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात अमिताभ बच्चन हे पोलिसांच्या भूमिकेत होते तर राणी आणि अभिषेक हे चोर होते. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अनन्या पांडे जगातील सर्वात मोठी मूर्ख’, म्हणत ‘या’ स्टारकिडला एनसीबी चौकशीला बोलावण्याचा कमाल खानचा दावा

-एनसीबीकडून आज पुन्हा होणार अनन्या पांडेची चौकशी

-अनन्या शाहरुख खानला म्हणाली होती ‘सेकंड डॅड’, नेमकं प्रकरण काय?

Latest Post