Thursday, July 18, 2024

मोठी बातमी! ‘चक दे इंडिया’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, कलाविश्वावर शोककळा

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रियो कपाडिया (Rio Kapadia) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतू त्यांच्या निधनावर कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने सर्वांची मन जिंकणारे रियो यांनी ‘दिल चाहता है’, ‘हॅपी न्यू इयर’, चक दे इंडिया अशा अनेक सिनेमात काम केले आहे. ( Chak De India Actor Rio Kapadia Dies At 66 After Battling Cancer )

रियो कपाडिया यांच्या पश्चात त्यांची पत्नी मारिया आणि अमन, वीर ही दोन मुले आहेत. त्यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवार, दिनांक 15 सप्टेंबर) गोरेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रियो कपाडिया यांचे मित्र फैजल मलिक यांनी सोशल मीडियावर रियो यांच्या निधनाती माहिती दिली. “मित्रहो, सांगताना अतिव दु:ख होत आहे की रियो कपाडिया आपल्यात राहिले नाहीत. 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. कुटुंबाकडून नंतर बाकी माहिती दिली जाईल.” असी पोस्ट त्यांनी केली आहे.

अधिक वाचा –
– ‘गदर २’ च्या दिग्दर्शकांनी केली नसीरुद्दीन शाह यांना विनंती; म्हणाले, ‘मला खात्री आहे तुमचे स्टेटमेंट बदलेल’
– आयुष्मान खुरानाला वाढदिवसाचे मिळाले सर्वात मोठे गिफ्ट, भविष्यातील स्वप्न देखील केले व्यक्त
– शाहरुखचा ‘जवान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज, ‘एवढ्या’ कोटींना विकले गेले ओटीटी राईट्स

हे देखील वाचा