Thursday, June 25, 2026
Home कॅलेंडर क्या बात है..! शूटींगदरम्यान सुरस्टार चिरंजीवीचा सोनू सूदला मारण्यास नकार, वाचा नेमकं काय घडलं

क्या बात है..! शूटींगदरम्यान सुरस्टार चिरंजीवीचा सोनू सूदला मारण्यास नकार, वाचा नेमकं काय घडलं

कोरोनाच्या या भयानक काळात अनेक गरजू लोकांच्या मदतीसाठी धावणारा आणि परप्रांतीयांना त्यांच्या गावी सुखरूप पोहचवणारा देवमाणूस म्हणजे सोनू सूद. आज कोरोना कमी झाला असला तरी सोनूची गरिबांसाठी आणि गरजूंसाठी अविरत मदत चालूच आहे.

लोकांना मदत करणे ही आता सोनूची जणू सवयच झाली आहे. चित्रपटांमध्ये वाईट काम करून खलनायक साकारणारा सोनू आता रियल ‘हिरो’ झाला आहे. २०२० सालाने सोनूची लोकांमध्ये असलेली प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. त्याच्या याच बदलेल्या इमेजचा एक किस्सा त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितला.

सोनूच्या ‘आचार्य’ नावाच्या एका साऊथ चित्रपटाचे शूटिंग चालू होते. या सिनेमाच्या एका सीनमध्ये साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांना सोनूला मारायचे होते. मात्र हा सीन करायला चिरंजीवींनी नकार दिला. चिरंजीवींनी सोनूला सांगितले की, ‘मी तुझ्यासोबत ऍक्शन सीन करणार नाही. कारण सध्या तुझी इमेज खूप वेगळी आहे. मी तुझ्यासोबत कोणतीही मारधाड असलेला सीन करू शकत नाही. मी तुला मारले तर लोकं मला शिव्या देतील आणि मारायला येतील. या सीनमुळे माझ्या प्रतिमेला सुद्धा धक्का बसेल त्यामुळे मी तुला मारणार नाही.’

Chiranjeevi & Sonu Sood
Chiranjeevi & Sonu Sood

या चित्रपट एका सीन होता ज्यात चिरंजीवींनी सोनूच्या डोक्यावर पाय ठेवला होता. हा सीन काढून टाकला आणि पुन्हा शूट करण्यात आला. सोनुने सांगितले की, ‘ तेलगू चित्रपटाच्या एका फिल्ममेकरने माझी साधायची लोकांमधील इमेज पाहुज स्क्रिप्ट मध्ये अनेक बदल केले आहेत. या बदलांमुळे मला माझे सीन पुन्हा शूट करावे लागले.’

सोनू पुढे म्हणाला २०२० साल माझ्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारे ठरले. वैयक्तिक आणि व्यासायिकदृष्टया दोन्ही जीवनाला २०२० ने बदलून ठेवले आहे. माझ्याकडे आता चित्रपटातील हिरोच्या भूमिकांसाठी विचारणा होत आहे. माझ्या भूमिकेला पुन्हा लिहले जात आहे. आज माझ्याकडे ५/६ चांगल्या स्क्रिप्ट आहे.’

सोनूने कोरोना महामारीच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या असंख्य परप्रांतीय लोकांना स्वखर्चाने पुन्हा त्यांच्या घरी पाठवले. अनेक गरजू लोकांना विविध प्रकारे मदत केली. सोनूच्या या निस्वार्थ कार्याची देशविदेशातून दाखल घेण्यात आली. त्याला या कार्यासाठी अनेक सन्मानाने गौरवण्यात देखील आले आहे.

हे देखील वाचा