कॉमेडीचा बादशाह असूनही गर्लफ्रेंडबरोबर लग्न करताना कपिलला आलं होतं टेन्शन, अशी झाली लव्हस्टोरी यशस्वी

Comedy king kapil sharma ani his wife ginni chatrath's love story


कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ हे दुसऱ्यांदा आई बाबा बनले आहेत. त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याआधी कपिल शर्मा याला एक मुलगी आहे. त्याचे वैवाहिक जीवन अत्यंत मजेत आणि समाधानी सुरु आहे. तर मंडळी आज जाणून घेऊयात याच कप्पू अर्थात कपिल शर्माची प्रेम कहाणी…

कपिलच्या प्रेमकहाणीची सुरुवात 2005 साली जालंधर मधील एचएमव्ही कॉलेजमध्ये झाली. त्यावेळी गिन्नी ही विद्यार्थिनी होती आणि कपिल नाटकाचा दिग्दर्शक होता. त्यातून तो काही पैसे कमावत असे. अशाच एका नाटकासाठी तो ऑडिशन घेण्यासाठी गिन्नीच्या कॉलेजमध्ये गेला होता. तिथेच त्या दोघांची पहिली भेट झाली.

त्यांच्या पहिल्या भेटीच्या वेळी कपिलचे वय 24 तर गिन्नीचे वय 19 होते. प्लेच्या शूटिंगच्या वेळी गिन्नी कपिलसाठी घरून डबा घेऊन येत असे आणि एका इंटरव्ह्यूमध्ये गिन्नीने हे कबूल देखील केले होते.  त्याच वेळेस तिला कपिल मनापासून आवडतात लागला होता, असेही ती म्हणाली होती.

त्यानंतर हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. घरी येणं-जाणं वाढलं आणि एक दिवस कपिलने गिन्नीच्या वडिलांकडे तिला लग्नासाठी मागणी घातली. परंतु गिन्नीच्या वडिलांनी या गोष्टीला साफ नकार दिला होता. परंतु 24 डिसेंबर 2016 ला कपिलने गिन्नीला कॉल केला आणि सांगितले त्याला तिच्यासोबत लग्न करायचे आहे आणि पुढे जाऊन 12 सप्टेंबर 2018 मध्ये त्या दोघांनी लग्न केले.

हेही वाचा-

प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या कपिल शर्माने शेअर केला मुलीसोबतचा गोंडस फोटो; पाहून तुम्हीही म्हणाल,  एकदम भारी! 

किस करण्यासाठी काय गरजेचे आहे? कपिल शर्माच्या प्रश्नावर ऋतिक रोशनने दिले भन्नाट प्रत्युत्तर, पाहा व्हिडिओ

कपिल शर्मा  सोबत पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवणार  सुनील ग्रोवर ! सलमान खानच्या प्रयत्नांना मिळाले यश?


Leave A Reply

Your email address will not be published.