Wednesday, July 3, 2024

वाढदिवस विशेष : बॉलिवूडचा कॉमेडी किंग विजय राजचा, असा आहे थक्क करणारा प्रवास

विजय राज (Vijay Raj) हा बॉलिवूड जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या तुफान कॉमेडीने आणि दमदार अभिनयाने त्याने ही लोकप्रियता मिळवली आहे. विजय राजच्या जबरदस्त कॉमेडिने प्रत्येकालाच खळखळुन हसायला लावले आहे. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक चित्रपट  सुपरहीट ठरतो. बॉलिवूडमध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसताना विजय राज यांचे हे यश कौतुकास्पद असेच आहे. आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने त्यांनी हे यशाचे शिखर गाठले आहे. साेमवारी(5 जून)ला अभिनेते विजय राज यांचा वाढदिवस आहे. चला, या निमित्त जाणून घेऊया त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल…

जून 1963 मध्ये एका साध्या कुटुंबात विजय राज यांचा जन्म झाला. आपले  शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्याच थिएटर ग्रुपमध्ये सामील होऊन ते पथनाट्य आणि नाटके सादर करायचे. विजय यांनी  एक प्रसिद्ध कलाकार बनून थिएटरमधून पैसे कमवायचे असेच छोटे स्वप्न पाहिले होते. यासाठी त्यांनी सुमारे 10 वर्षे केवळ रंगभूमीवरच नाटकात काम केले.

कॉलेज सोडल्यानंतर विजय राज यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) परीक्षा दिली, ज्यामध्ये त्यांची निवड झाली. एकदा विजय राज एनएसडीमध्ये नाटक करत होते. यादरम्यान नसीरुद्दीन शाह यांची नजर विजय राज यांच्यावर पडली. त्यांनी विजयला मुंबईला बोलावले. मुंबईत कामाचे स्वप्न उराशी बाळगून विजय राज मुंबईत आले इथूनच त्यांच्या अभिनय कारकिर्दिला खरी सुरूवात झाली. मुंबईला पोहोचल्यावर विजय राज यांनी नसीरुद्दीन यांची भेट घेतली. त्या दिवशी अभिनेते नसरुद्दीन शाह ‘भोपाळ एक्सप्रेस’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते.

नसीरुद्दीन यांनी विजय राजसाठी चित्रपटात छोटी भूमिका मागितली. अशा प्रकारे त्यांचा पहिला चित्रपट ‘भोपाळ एक्सप्रेस’ होता. राम गोपाल वर्मा यांच्या ‘जंगल’ या चित्रपटातही विजय राज यांना काम करण्याची संधी मिळाली. हिट चित्रपटाच्या शोधात त्यांनी  दिग्दर्शक मीरा नायरच्या मान्सून वेडिंग चित्रपटात पीके दुबेची भूमिका साकारली. प्रेक्षकांना त्याची कॉमिक शैली खूप आवडली,त्यानंतर त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचे नामांकन मिळाले. त्यानंतर 2004 मध्ये ‘रन’ हा चित्रपट आला होता. हा विजयच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटात विजय राजने गणेशच्या व्यक्तिरेखेत लोकांना खूप हसवले.

‘रन’ नंतर विजय राज यांनी मागे वळून पाहिले नाही. यानंतर धमाल, डेढ इश्किया, वेलकम आणि गंगूबाई काठियावाडी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. विजय राज त्यांच्या कॉमेडी व्यतिरिक्त त्यांच्या दमदार आवाजासाठी देखील ओळखले जातात. (comedy king vijay raj bithday special)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षरा सिंगचे रोमँटिक गाणे ‘अखियां घायल करे’ रिलीज, अभिनेत्रीची स्टाइल पाहून चाहते थक्क
नसीरुद्दीन शाह यांनी मिळालेल्या अवॉर्डपासून बनवली आहेत दरवाजाची हँडल्स, काय आहे नेमके प्रकरण? लगेच वाचा

हे देखील वाचा