आपल्या विधानांमुळे वादात अडकलेले बॉलिवूड कलाकार; जया बच्चन यांनी तर शाहरुख खानला कानाखाली…


देशात राजकारणी आणि अभिनेते यांची अनेक विधाने नेहमीच चर्चेची ठरताना दिसून येतात. हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात ही विधाने काही मिनिटांतच व्हायरल होतात. यामागील एक मोठे कारण म्हणजे आधी या वक्तव्यावर केवळ मोठमोठे कलाकारांच्याच प्रतिक्रिया समोर यायच्या. कारण त्यांच्याच प्रितिक्रिया प्रकाशित केल्या जात असे. परंतु आता तसे राहिले नाही आता लोकांकडे सोशल मीडियासारखे मोठे व्यासपीठ आहे, जेथे ते प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करू शकतात. हेच कारण आहे की विधानामुळे चर्चेत आलेल्या मोठ्या सेलिब्रिटींना देखील सोशल मीडियावर बर्‍याच वेळा माफी मागावी लागते. तरीही बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकवेळा या विधानांमुळे चर्चेत राहतात आणि वादातही अडकतात. अनेक स्टार्सच्या बाबतीत असे घडले आहे की त्यांचे वक्तव्य व्हायरल होऊन सोशल मीडियावर त्यांना नेटकऱ्यांनीं बरेच काही सुनावले आहे.

बॉलिवूड सेलेब्रिटीनीं काहीही केलं, तरीही तो चर्चेचा विषय बनतो. त्यांची नाईट पार्टी असो किंवा कोणत्याही विषयावरील त्यांचे मत असो, सोशल मीडियावर सर्वांचेच खूप लक्ष असते. त्याचवेळी, कधीकधी ते त्यांच्या विधानांबद्दल वाईट पद्धतीने अडकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगणार आहोत, ज्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलाच गोंधळ निर्माण केला होता.

विधानामुळे चर्चेत आले होते सेलिब्रिटी

महेश भट्ट
महेश भट्ट आणि वाद विवाद यांचे खूप जुने संबंध आहेत. ते त्यांच्या वेगळ्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात. मात्र, त्यांचा हा बोल्डनेस इतर कोणत्याही स्त्री किंवा अभिनेत्रीसाठी समजून घेतला गेला असता, परंतु त्यांनी स्वतःच्याच मुलीच्या बाबतीत असे धाडस केले होते. एकदा महेश भट्ट यांनी आपल्या मुलीबद्दल असे काही विधान केले की, त्यांच्यावर खूप टीका केली गेली. एका मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले होते की, पूजा त्यांची मुलगी नसती, तर तिच्याशीच लग्न केले असते. संपूर्ण प्रकरण असे की, महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी एक फोटोशूट केले होते. यामधील एका फोटोमध्ये महेश भट्ट पूजा भट्टला किस करताना दिसून आले होते. हे चित्र प्रकाशित होताच मोठी खळबळ उडाली होती.

जया बच्चन
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बी यांच्या पत्नी जया बच्चन नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्या राजकारणात देखील सक्रिय आहेत आणि बर्‍याचदा त्यांच्या विरोधकांवर तीव्र हल्ला करताना दिसून येतात. पण एकदा जया बच्चन यांनी बॉलिवूडच्या किंग खान शाहरुखवर वादग्रस्त भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, “शाहरुखने माझ्यासमोर ऐश्वर्याबद्दल काही बोलले असते, तर मी त्याला कानाखाली मारली असती.”

आमिर खान
आमिर आणि शाहरुख या दोघांमध्ये चांगली मैत्री दिसून येते. दोघेही एकमेकांबद्दल खूप आदर करतात. पण एक वेळ अशी होती की, जेव्हा ते एकमेकांना ढुंकूनही पाहत नसत. एकदा आमिरने शाहरुखबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी शाहरुख माझे पाय चाटत असल्याचे आमिरने म्हटले होते. आमिरने त्यात म्हटले होते की, शाहरुख आमच्या कुत्र्याचे नाव आहे. आमिर खानच्या या वादग्रस्त विधानावर बरीच टीका झाली होती.

सलमान खान
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानदेखील बर्‍याचवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शाहरुखशी असलेला वाद असो किंवा ऐश्वर्याशी झालेले भांडण, तो नेहमीच चर्चेत राहतो. एकदा त्याच्या ‘सुलतान’ चित्रपटाच्या प्रमोशन संदर्भात मुलाखत देताना असेच एक वादग्रस्त विधान त्याने केले होते. सलमानचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता, पण या काळात त्याने केलेलं हे विधान लोकांना फारसे आवडले नव्हते. खरं तर, त्याला विचारलं गेलं की चित्रपटात त्याचा लंगोट परिधान करण्याचा अनुभव कसा होता. यावर सलमानने उत्तर दिले होते की, चित्रपटाच्या शूटिंगचा थकवा हा बलात्कार पीडितेसारखा होता. त्यांच्या या विधानावर बरीच खळबळ उडाली होती.

शाहिद कपूर
एक काळ असा होता की शाहिद आणि करिनाचे प्रेम बॉलिवूड जगतात गाजले होते आणि त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र होती. मात्र, ‘जब वी मेट’ या चित्रपटानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यादरम्यान शाहिदने एक वादग्रस्त विधान केले. एका मुलाखतीदरम्यान शाहिदला करीना कपूरसोबत पुन्हा काम करण्याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा शाहिदने उत्तर दिले होते की, मी करीनाबरोबर नक्कीच काम करतील. जर माझ्या दिग्दर्शकाची मी गाय, म्हशीसोबत रोमान्स करावा अशी इच्छा असेल तर मी तेही करेन. असे विधान त्याने केलं होतं. शाहिदच्या या विधानावर बरीच टीका करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दारूचा वास लपवण्यासाठी धरम पाजी खाऊन यायचे कांदा; जाम वैतागलेल्या आशा पारेख यांनी केली होती थेट दिग्दर्शकाकडे तक्रार

-वेगळे राहूनही डिंपल यांनी घेतला नव्हता राजेश खन्नांपासून घटस्फोट; सनी देओलसोबत देखील जोडले होते त्यांचे नाव

-अक्षय कुमारच्या प्रेमात बुडाली होती शिल्पा शेट्टी; धोका मिळाल्यानंतर थाटला आधीच विवाहित असलेल्या राज कुंद्राशी संसार


Leave A Reply

Your email address will not be published.