एवढं महाग! राजकुमारने लग्नात पत्रलेखाला घातले तब्बल ‘इतक्या’ लाखांचे मंगळसूत्र, सर्वत्र रंगलीय चर्चा


प्रत्येकाला आपल्याला लग्नाविषयी एक वेगळीच उत्सुकता असते. आपल्याला आपल्या लग्नात काय नवीन करता येईल हे प्रत्येकजण ठरवत असतो. राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी चंदीगडमधील ओबेरॉय सुख विलास लक्झरी रिसॉर्टच्या कोहिनूर व्हिलामध्ये सात फेरे घेतले आहे आणि नुकतेच मुंबईला परतले आहेत. बुधवारी (१७ नोव्हेंबर) दोघेही विमानतळावर स्पॉट झाले होते. जिथे सर्वांच्या नजरा या नव्या जोडप्यावर खिळल्या होत्या.

विमानतळावर नववधूच्या लूकमध्ये पत्रलेखा खूपच सुंदर दिसत होती. यादरम्यान तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती, ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत होती. त्याचवेळी राजकुमार रावही पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये खूपच सुंदर दिसत होता. यादरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे, पत्रलेखाच्या मंगळसूत्राने.

राजकुमारने लग्नात पत्रलेखाला घातलेले मंगळसूत्र प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांच्या कलेक्शनमधील आहे. मोती आणि गोमेदने बनवलेले हे मंगळसूत्र १८ कॅरेट सोन्याचे असून, त्यात काळे आणि सोनेरी मोती वापरण्यात आले आहेत. मंगळसूत्राच्या किमतीबद्दल बोलायचे झाले, तर त्याची किंमतही आश्चर्यचकित करणारी आहे.

या मंगळसूत्राची किंमत १ लाख ६५ हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्रलेखाने तिच्या लग्नात सब्यासाची यांनी डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. यासोबतच तिने लाल रंगाची चुनरी घेतली होती आणि नाकात सुंदर रिंग आणि कपाळावर बिंदी कुंकू लावले होते. वधूच्या अवतारात पत्रलेखा खूपच सुंदर दिसत होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नवविवाहित जोडपे हनीमूनपूर्वी त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करतील. त्यानंतरच ते त्यांचे हनीमून प्लॅन करतील. राजकुमार राव १८ नोव्हेंबरपासून अनुभव सिन्हा यांच्या भीड’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राजकुमारने अनुभव सिन्हा यांना शूटिंगसाठी आधीच तारखा दिल्या होत्या, त्यामुळे त्याने हनीमूनला जाण्यापूर्वी शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

-श्वास रोखून धरा! करणच्या पहिल्या ऍक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार सिद्धार्थ, पाहा फर्स्ट लूक

-‘रस्ता दिसतोय तिथपर्यंत चालत राहा’, अनुपम खेर यांनी शेअर केलेली पोस्ट ठरतेय लक्षवेधी


Latest Post

error: Content is protected !!